![]()
पुणे शहरातील ऐतिहासिक व वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ आज लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथून झाला. यावेळी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. गणरायाला निरोप देताना त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा देत पोलिसांनी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रासह देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण आहे. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी श्रद्धा आणि ओढ आहे. सर्वप्रथम मी गणरायाला नमन करते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता, सन्मान तसेच महिलांची सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी पोलिसांनी चांगली व्यवस्था केली आहे. महिला आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचेही डॉ. गोऱ्हे यांनी स्वागत केले. दरम्यान, दुष्काळ निवारण आणि जलसंधारणाच्या प्रश्नावरही डॉ. गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला आहे. केज, लातूर, अहमदपूर, तुळजापूर यांसह विविध तालुक्यांमध्ये जैवशेती, जलसंधारण आणि दुष्काळ निवारणासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या त्या संपर्कात आहेत. या संस्थांच्या अनुभवातून दुष्काळाच्या समस्येवर शाश्वत मार्ग कसा काढता येईल, याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “दुष्काळग्रस्त भागातील स्थानिक अनुभव, जलसंधारणाची कामे आणि जैवशेतीच्या माध्यमातून उपलब्ध झालेले पर्याय यांचा अभ्यास करून शासनाकडे ठोस स्वरूपात पाठपुरावा केला जाईल,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
Source link
गणेश विसर्जनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश:दुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपायांचा शासनस्तरावर पाठपुरावा करणार- डॉ. नीलम गोऱ्हे