Headlines

कार्यकर्ते, नेत्यांच्या गर्दीत शेतकरी दुर्लक्षित:दुष्काळ पाहणीत पाेलिसांनी शेतकऱ्यांना राेखले; अधिकारी-कर्मचारी 3 तास ताटकळत‎




दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्ते, नेत्यांचीच प्रचंड गर्दी होती. बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. अनेक ठिकाणी पोलिसांनी ग्रामस्थांना रोखले. मात्र कार्यकर्ते, नेत्यांच्या महागड्या गाड्या पाहणी होणाऱ्या शेतापर्यंत सोडण्यात आल्या. यंदा अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह सर्व खरीप पिके गंभीर संकटात सापडली. दरम्यान २३ सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांनी बाळापूर तालुक्यातील पिकांची पाहणी केली. सोबत पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. ना. शिंदे यांचे स्वागत व भेटीसाठी भाजप, शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती. मात्र अनेक नेते-पदाधिकाऱ्यांकडे पास नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. परिणामी काही वेळ शाब्दिक चकमकही उडाली. स्वागतासाठी आणलेले बुके परत नेले. राजकीय संधीसाठी अशीही चढाओढ {नियोजित कार्यक्रमानुसार ना. शिंदे यांचे शिवणी विमानतळावर दुपारी १२.१५ वाजता आगमन होणार होते. मात्र विमान सुमारे ३ वाजता आले. नियोजित दौऱ्यानुसार संबंधित ठिकाणी मोजके शेतकरी शेतात होते. तोपर्यंत ते ताटकळत परिसरात थांबले होते. {ताफ्यामध्ये ५० पेक्षा जास्त महागड्या गाड्या होत्या. अशातच ना. शिंदे हे कोणत्या गाडीत बसतील, यावरूनही त्यांच्या नेत्यांमध्ये चढाओढ रंगली होती. आधी बुलढाणा येथून आलीशान गाडी मागवण्यात आली. मात्र तांत्रिक कारणामुळे या गाडीतून प्रवास रद्द केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *