Headlines

बंधारे भरून देण्याची प्रवरा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी केली मागणी:जलसंपदा मंत्री विखे‎यांना दिले निवेदन‎




प्रवरा नदीपात्रातील सर्व बंधारे सध्या पूर्णपणे कोरडे पडल्याने आंबी, केसापूर दवणगाव, बेलापूर खुर्दसह नदीकाठच्या गावांमधील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरी आटल्या आहेत. यामुळे पिण्याचे पाणी, शेतीचे सिंचन आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भीषण पाणीटंचाईतून मुक्तता करण्यासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडून सर्व बंधारे भरण्यात यावेत आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी प्रवरा नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात बेलापूर खुर्दचे उपसरपंच ॲड. दीपक बारहाते आणि राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंतराव कोळसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री विखे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ​यावेळी बेलापूर खुर्द सोसायटीचे माजी चेअरमन गोरख भगत, केसापूरचे माजी सरपंच गुलाबराव डोके, विलास भालेराव, दादा महाडिक, ललित टाकसाळ, कुंडलिक खपके, डॉ. सर्जेराव सोळुंके, ज्ञानदेव देठे, सुरेश टाकसाळ, राजेंद्र टाकसाळ, राजेंद्र भगत आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांची व्यथा आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत दिले. प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत त्वरित आढावा घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मंत्र्यांच्या या दिलासादायक आश्वासनानंतर उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी विखे यांचे आभार मानले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *