Headlines

पाच खेळाडूंची विभागीय पातळीवर झाली निवड‎:जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेत नामपूर महाविद्यालयाचे यश




येथील समाजश्री प्रशांत हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मुलांच्या बेसबॉल संघाने आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने आपल्या क्रीडा कौशल्याची पुन्हा एकदा प्रभावी छाप उमटवत विद्यापीठीय पारितोषिक प्राप्त करून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. लासलगाव येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेत नामपूर महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सुरुवातीच्या सामन्यात नामपूर संघाने लासलगावच्या संघावर विजय मिळवला; तर त्यानंतर एच.पी.टी. महाविद्यालयाविरुद्ध झालेल्या चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत समाजश्री प्रशांतदादा हिरे नामपूर महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी के. के. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत यांच्या संघावर मात करून जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत नामपूर महाविद्यालयाच्या एकूण १५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी फुरकान खान, प्रथमेश कसबे, दीपक आव्हाड, महेश निहारकर आणि आशिष शेजवळ या पाच खेळाडूंची २० ते २१ सप्टेंबर दरम्यान अकोले येथे होणाऱ्या आंतरविभागीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच नामपूर संघातील फुरकान खान याची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *