Headlines

विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार:कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव, यवतमाळ-नागपूरसह 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट




देशाच्या वायव्य भागातून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली असली तरी, महाराष्ट्रात मात्र पावसाचा मुक्काम अजून काही दिवस कायम राहणार असल्याचे चित्र आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे राज्याच्या वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असून, आज अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीपासून थेट अंदमान समुद्र आणि थायलंडच्या आखातापर्यंत हवेचा एक मोठा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रात घडणाऱ्या या घडामोडींचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत असून, विदर्भ आणि मराठवाड्यात बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने पावसाची शक्यता दुणावली आहे. विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’, तर कुठे कोणता इशारा? आज पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ (अतिवृष्टीचा इशारा) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त राज्याच्या इतर भागांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे, ज्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे: जोरदार पावसाची शक्यता: हिंगोली, नांदेड, वर्धा, भंडारा आणि गोंदिया. वादळी वाऱ्यासह पाऊस: जालना, बीड आणि धाराशिव. विजांच्या कडकडाटासह पाऊस: छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याचा घाटमाथा. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू एकीकडे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असताना, देशाच्या पातळीवर मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. वायव्य भारतातून मॉन्सूनने माघार घेतली असली तरी, बंगालच्या उपसागरातील नवीन प्रणालीमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे बळीराजाने पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्लाही कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर: आधीचे ‘यलो अलर्ट’ कोरडे; पुन्हा 3 दिवस पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (२३ सप्टेंबर) शहर व जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला होता, मात्र या अलर्टने नेहमीप्रमाणेच हुलकावणी दिली. या महिन्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांची अशीच अवस्था झाली आहे. असे असले तरी, आता विभागाने पुन्हा एकदा २४, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी शहर व परिसरासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या महिन्यात १२, १३ आणि १९ सप्टेंबरलाही यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, १२ सप्टेंबर रोजी शहरात केवळ ६.३ मिमी, १३ तारखेला ७.३ मिमी पाऊस पडला, तर १९ आणि २३ तारखेला पावसाने शहराला पूर्णपणे हुलकावणी दिली. दरम्यान, बुधवारी पावसाचा पत्ता नसला तरी शहराचे कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सियस नोंदवल्याची माहिती आहे. तीन दिवस वाऱ्याचा जोर : २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत शहर आणि परिसरात वाऱ्याचा जोर राहील. ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाची शक्यता कमीच चक्रवात अर्णबचा प्रभाव दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर होता. येत्या दोन दिवसांत तो वाढेल. मात्र, ढगांचे केंद्रीकरण चक्रवाताच्या दिशेने होत असल्याने, २४ तारखेला मराठवाड्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहील. त्यानंतर चक्रवाताचे केंद्र विदर्भाकडे सरकणार असल्याने, मराठवाड्यात पावसाची शक्यता कमीच राहील. -श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम विज्ञान केंद्र. हेही वाचा.. ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार:पावसामुळे अनेक पूल वाहून गेले; 5,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, आंध्र प्रदेश आणि बंगालमध्येही अलर्ट बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ अर्नब ताशी १२ किमी वेगाने पश्चिम दिशेने सरकले आहे. हे चक्रीवादळ आज ओडिशातील कलिंगपट्टणम किनाऱ्यावर धडकू शकते. IMDच्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरच्या रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यादरम्यान, विशाखापट्टणम आणि गोपालपूरच्या मध्ये कलिंगपट्टणमजवळ तीव्र दबावाच्या स्वरूपात ते किनारा ओलांडू शकते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *