![]()
नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील कारवाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली आहे. अशोक खरातच्या जागी जर एखादा मुस्लिम असता, तर आतापर्यंत अख्या मुसलमानांची वरात काढली असती, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, कोणत्याही गुन्ह्याकडे पाहताना त्याचा धर्म किंवा जात पाहणे चुकीचे आहे. अशोक खरातने जे काही केले ते अत्यंत चुकीचे आहे. नालायक माणसाला नालायक म्हणायची हिंमत सर्वांमध्ये असली पाहिजे, मग तो कोणत्याही जातीचा का असेना. शेतकरी मदतीपासून वंचित विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून, ती केवळ एक ‘बनवाबनवी’ आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होत नाही, तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार नाही.सरकारने केवळ आकड्यांचा खेळ न मांडता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा. विमा योजनेच्या माध्यमातून केवळ विमा कंपन्यांचे भले होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेला शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांचे खिसे भरले जात आहेत. सीएम-डीसीएम यांची भेट घेण्यात गैर काय? विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी उबाठाचे खासदार सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतात, सत्ता त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही सुद्धा जात असतो. मतदारसंघातील कामे असतात त्यासाठी जाण्यात गैर काय? उद्धव ठाकरे वेळ देत नाही हा केवळ आरोप आहे, आम्ही ज्या ज्या वेळी त्यांची वेळ मागितली त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आहे. कोणाचे जेवन चांगले वाटले म्हणून खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले असतील. यावर जास्त काही बोलणं योग्य नाही. पक्ष फुटण्याची काही चिन्ह आता तरी काही दिसत नाही.
Source link
खरातच्या जागी मुस्लिम असता तर वरात काढली असती:नालायकाला नालायक म्हणायची हिंमत ठेवा, विजय वडेट्टीवारांनी सुनावले खडे बोल