![]()
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीयपद्धतीने पर्दाफाश केला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून, वेशांतर करून या कॉर्पोरेट जाळ्याचा भांडाफोड करणाऱ्या महिला पोलिसांचे धाडस आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 9 धाडसी मुलींमुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: उपआयुक्त मोनिका राऊत या महिला अधिकाऱ्याची निवड केली. त्यांच्यासोबत स्वतंत्र तीन महिला अधिकारी, कर्मचारी अशा मोजक्याच 7 कर्मचाऱ्यांची टीम तयार करून सर्व सूचना दिल्या. अतिशय बारकाईने व सर्वंकष नियोजन करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यात आला. सामाजिक दडपण आणि कुटुंबाच्या भीतीपोटी पीडित युवती गप्प होत्या. मात्र, 9 धाडसी मुलींनी आणि धर्मांतराचा प्रयत्न झालेल्या देवळाली कॅम्पमधील तरुणाने पुढे येऊन तक्रार नोंदवल्याने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. आरोपी इतके निर्ढावलेले होते की, एखादी मुलगी कामावर आली नाही तर ते थेट तिच्या आईशी संपर्क साधून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असत. या प्रकरणात कंपनीतील पुण्यातील महिला एचआर आणि असिस्टंट मॅनेजर स्तरावरील व्यक्तींचाही सहभाग असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. ‘विकेंड ट्रिप’च्या बहाण्याने शोषण तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सफी भिकन शेख, असिफ आफताब, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, दानिश शेख आणि तौसीफ आत्तर यांसारख्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी कंपनीत टीम लीडर सारख्या पदांचा गैरवापर केला. नोकरीच्या आमिषाने आलेल्या मुलींना सुरुवातीला विश्वासात घेतले जायचे. त्यांना अल्पावधीतच प्रमोशन देण्याचे तर काहींना कंपनीच्या मुंबई, पुण्याच्या शाखेत मोठ्या पदावर संधी उपलब्ध करून देण्याचे आमीष दाखवायचे. त्यानंतर त्यांना मोठ्या रिसॉर्ट्स किंवा वॉटरपार्कच्या ठिकाणी ‘विकेंड ट्रिप’च्या बहाण्याने नेले जात असे. तिथे नियोजनपूर्वक त्यांच्या भावनांशी खेळून, त्यांना फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले जात आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असे. पीडितेचे राहणीमानही बदलले तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडितेच्या मनावर इतका पगडा निर्माण केला होता की, तिने स्वतःच्या धर्मातील रूढी-परंपरा सोडून संशयितांच्या धार्मिक प्रथांचे पालन करण्यास सुरुवात केली होती. पीडित तरुणी गेल्या दोन वर्षांपासून सलग महिना-महिनाभर उपवास (रोझा सदृश उपवास) धरत होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी कितीही आग्रह केला किंवा घरी बोलावले, तरी ती त्यांना स्पष्टपणे नकार देत असे. आरोपींच्या प्रभावामुळे पीडितेने तिचे राहणीमानही पूर्णपणे बदलले होते. गेल्या वर्षभरापासून तिने ‘लिप्स्टिक’ लावणेही बंद केले होते. तिच्या नैसर्गिक पेहरावात आणि वागण्याबोलण्यात झालेला हा बदल पाहून तिचे जवळचे लोकही अवाक झाले होते. असा झाला तपासाचा थरार महिला पोलिसांचे वेशांतर हे रॅकेट अत्यंत संघटित आणि कॉर्पोरेट स्तरावर कार्यरत असल्याने त्याचे पुरावे गोळा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान महिला पोलिसांनी धाडसी पाऊल उचलले. अधिकाऱ्यांनी वेशांतर करून संबंधित कंपनीत आणि संशयित ठिकाणी वावर ठेवला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या जाळ्यातील व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. आरोपींची कार्यपद्धती, त्यांच्या संभाषणाची पद्धत आणि मुलींना कशा प्रकारे जाळ्यात ओढले जाते, याचे ठोस पुरावे गोळा केले. काही ठिकाणी योग्य ऑडिओ व्हिज्युअल पुरावेदेखील गोळा केले. 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या पथकाने सलग 10 दिवस कधी दिवसा तर कधी रात्री उशिरापर्यंत आयटी कंपनीच्या कार्यालयात वेशांतर करून तिथे वावर ठेवला. एवढेच नव्हे तर संशयितांचे संभाषण, त्यांचा वावर, त्यांची मुलींवर असणारी नजर, टोमणे मारणे, हेतूत: जवळ जावून स्पर्श करणे, त्यांच्या चेहऱ्याला, गालाला हात लावणे, खुर्चीवरून उठल्यावर अथवा बसताना पार्श्व भागावर हात फिरवणे असे प्रकार नजरेस आले. पोलिसांनी 40 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमरे तपासले. त्याचबरोबर या पीडित महिलांना तास-तास भर भेटून त्यांच्या व्यथा समजून घेत त्यांना धीर दिला. संपूर्ण पोलिस यंत्रणा तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिल्याने त्या अन्यायाच्या विरोधात पुढे आल्या. तो खुर्चीजवळ माझ्या अंगाला स्पर्श होईल, असा उभा होता मला वाटलं होतं की ही मोठी, बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. तिथे आपल्यासाठी चांगल्या कामाचे वातावरण असेल. पण हळूहळू लक्षात आले की तिथे कामापेक्षा माझा धर्म आणि माझ्या विचारांबद्दल जास्त बोललं जातंय. माझ्या मनात माझ्याच धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘जिहाद’पेरला जात असल्याचे वेळीच लक्षात आलं. एवढंच नव्हे तर तौसिफ अत्तार नावाचा प्रोसेस लीडर एकदा माझ्या अंगाला स्पर्श होईल अशा पद्धतीने माझ्या खुर्चीजवळ उभा होता. हे शब्द आहेत नाशिक येथील आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार झालेल्या 25 वर्षीय तरुणीचे. तिने ‘दिव्य मराठी’ला सांगितलेली आपबिती तिच्याच शब्दांत. मी प्रोसेस असोसिएट पदावर होते. प्रोसेस लीडर तौसिफ अत्तारशी नेहमी कामानिमित्त बोलणं होत असे. दुसऱ्या विभागातील काही जणींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी एचआर हेडकडे झाल्याचे माझ्या कानावर आलं होतं. एकदा ऑफिसच्या लॉबीमध्ये मी आणि दोन मैत्रिणी ताक पीत होतो. फोन आल्याने दोघीजणी निघून गेल्यावर दोन पाच मिनिटात तौसिफ आला. बहुतेक तो दोघी जाण्याची वाट बघत असावा. मग मी बसलेल्या खुर्चीजवळ अंगाला स्पर्श होईल असा तो उभा राहिला. माझ्याकडे वेगळ्याच नजरेने एकटक रोखून बघत होता. मी ताक पिताना त्याने ‘क्या पी रही हो’ असे विचारलं. मी त्याला ‘छांस पी रही हूं’ असे सांगितले. तेव्हा तौसिफने स्वत:च्या गुप्तांगाकडे इशारा करून ‘मेरे पास भी छांस है, तुझे चाहिये क्या’ असे विचारत अश्लील हावभाव केले. कायद्याच्या बालेकिल्ल्यात भरपेट ‘पाहुणचार’ या प्रकरणातील पाच संशयितांना कायद्याच्या बालेकिल्लामध्ये हजर करत भरपेट पाहुणार करण्यात आला. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने आज (दि. 10) त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, फरार एचआर मॅनेजर अश्विनी चेनानी यांना गुन्हे शाखेच्या पथकाने कात्रज येथून ताब्यात घेतले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी या संशयितेचाही चांगलाच ‘पाहुणाचार’ केला.
Source link
आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार:नोकरीच्या आमिषाने 'विकेंड ट्रिप' अन् धर्मांतराचा दबाव, सलग दोन वर्षे महिनाभर उपवास अन् 'लिप्स्टिक'वरही बंदी!