.


शासन व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपयोगी यंत्रे व औजारांच्या अनुदानित योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली विविध यंत्रसामग्री अनुदानावर किंवा कमी दरात दिली जातात.मात्र, बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित किटचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस व इतर नगदी पिकांच्या क्षेत्रात मागील काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः केळी आणि डाळिंब, द्राक्ष उत्पादकांनी मोठी आघाडी घेतली आहे. आगामी काळात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठी होईल तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतक-यांना किटसाठी सुमारे २५ हजार खर्च करावा लागतो. त्यामुळे अनुदानित योजनांमधून एआय किट द्यावे, अशी मागणी होत आहे. लक्ष्य फवारणी: जिथे गरज आहे तिथेच औषध फवारणी करून खर्चात बचत. प्रिसिजन फार्मिंग: माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, ठिबकचा वापर. निर्यात दर्जा : बंच स्प्रे, स्कर्ट बॅग, बड इंजेक्टर या साधनांमुळे केळीचा दर्जा. ^सोलापूर जिल्ह्यात एकूण सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. करमाळा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आहे. जिल्ह्यात डाळिंब व द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी, तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादनासाठी कृषी यंत्र औजार या अनुदानित योजनेत एआय किटचा समावेश करण्यात यावा. संतोष झांझुर्णे, प्रगतशील शेतकरी, रामवाडी . खते व पाणीवापर खर्चात मोठी बचत . कीड व रोग नियंत्रणामुळे उत्पादनात वाढ . केळीला जागतिक बाजारपेठेत चांगला दर . टिश्यू कल्चर, मल्चिंगमुळे दर्जा सुधारणा ^कृषी यंत्र औजार अनुदान योजनेत एआय किटचा समावेशाची मागणी होत आहे. कोणती यंत्रे, औजारांसाठी योजना राबवण्याचे धोरण शासनस्तरावर ठरते. वरिष्ठांकडे मागणीचा प्रस्ताव पाठवून योग्य कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. – राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी , करमाळा. ^मागील २ वर्षापासून माझ्या शेतात एआय तंत्रज्ञान वापरुन शेती करत आहे. त्यामुळे मोठा बदल घडून आला असून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून तब्बल एकरी ११० टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. धुळाभाऊ कोकरे, कुगाव, ता करमाळा.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
योजनेत एआय किट करता पाठपुरावा करु
हवामानाचा अंदाज घेऊन पिकांना आवश्यक तेवढेच पाणी नियोजन.