Headlines

खा. प्रणितींचा पालकमंत्र्यावर प्रहार, शेतकऱ्यांना धीर‎:अवकाळीने झालेल्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी, पालकमंत्री गोरे यांच्यावर सडेतोड टीका‎


.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यातील तनाळी या गावांला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच शासनाने तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीस आलेली पिके व फळबागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे दिसत आहे. तालुक्यातील द्राक्ष, केळी, कांदा, पेरू यांसह विविध फळबागा, भाजीपाला आणि काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पूर्णतः नुकसानग्रस्त झाली आहेत.

या पाहणी दौऱ्यावेळी पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, तालुका उपाध्यक्ष सादिक मुलाणी, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सरपंच सुधाकर मोटे, म्हाळप्पा मासाळ, ज्ञानेश्वर होनमाने, लक्ष्मण श्रीराम, भीमराव पाटील, सुभाष लवटे, विलास रोंगे, पांडुरंग रोंगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच मार्च व एप्रिल २०२६ महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. केळी, पपई, डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्षे, मका व बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांनुसार तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रतिनिधी | मंगळवेढा मी महाविकास आघाडीचे खासदार असल्या कारणाने भाजप सरकार सार्वजनिक कामाची आडवणूक करीत आहे. आम्ही निवडून आलो की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कोणत्या पक्षाचे राहत नाही. मात्र पालकमंत्री निधीच्या माध्यमातून कामांची अडवणूक करीत असून आमची अडवणूक ही जनतेची आहे, हे यांच्या लक्षात येत नाही, असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले ते घरनिकी येथे गाव भेट दौऱ्यात बोलत होत्या. यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, ॲड. दत्तात्रय खडतरे, राजू मेतकुटे, अविनाश मोरे, सरपंच सुनीता रणदिवे, उपसरपंच बालाजी गरड, बापू भुसे, सदस्य राजाराम मोरे उपस्थित होते. यावेळी घरनिकी ते खंडोबा नगर खोल वाट रस्ता खराब झाला आहे तो नवीन करावा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तो रस्ता बसवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुस्लिम मुस्लिम समाजासाठी सभा मंडपाची ही मागणी यावेळी करण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांनी या सर्वावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच लाईटी संदर्भात निवेदन स्वीकारली नवीन अंगणवाडीचा प्रस्तावित स्वीकारला. तसेच ज्या लोकांना घरकुल मंजूर झालेले आहेत. परंतु त्यांना जागा नाही, अशासाठी गावठाण विस्तार योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून देण्याचे ठरले. यावेळी राजन ठेंगील, ज्ञानेश्वर सोरडीकर, निसार पटेल, बापूनिसार पटेल, बापू अवघडे, सुनीता अवघडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केले.

७० रुपयांची द्राक्षे ९ रुपये किलोने विकावी लागली यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, अवकाळी पाऊस येण्यापूर्वी ७० ते ८० रुपये किलो दराने द्राक्षे विकली जात होती.मात्र पाऊस आल्यानंतर बागा पडल्या आहेत. शिवाय पाऊस पडल्याने द्राक्ष घडा मध्ये पाणी साठले आणि, मणी गळती झाली आहे, मणी सडून जात आहेत. त्यामुळे ही द्राक्षे आता वायनरी साठी ८ ते ९ रुपये किलोने मागितली जात आहेत. या दराने घेण्यासाठी वायनरी चालक तयार नाहीत. काढणीचा खर्चही निघत नाही, बळेच द्यावी लागत आहे, अशी खंत शेतकरी ज्ञानेश्वर होणमाने यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *