Headlines

गहू खरेदीसाठी तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी:व्यापारी कमी दराने गहू करतात खरेदी, तहसीलदारांना दिले निवेदन‎



गहू पिकासाठी शासनाच्या हमी भावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे बाजार समितीच्यावतीने तहसील डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात १८,७८६ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र असू

.

परंतु मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात गहु पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. शासनाने गहू या पिकासाठी २५८५ रुपये प्रती क्विंटल इतका हमीभाव जाहीर केलेला असताना काही व्यापारी मालाची प्रत खूप कमी आहे असे कारणे देऊन गहू अवघ्या १८०० ते २२०० रुपये भावाने खरेदी करत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे प्राप्त होत आहेत.

सध्या तालुक्यात शासनाने गहु खरेदी करण्यासाठी अधिकृत हमीभाव खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने गहू विकावा लागत आहे. तसेच वाहतूक खर्च, मजुरी खर्च आणि इतर शेतीसंबंधित खर्च वाढलेले असल्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. शासनाने नेवासा तालुक्यात तात्काळ गहू खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करावे तसेच खरेदी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने राबवावी जेणे करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. या बरोबरच खरेदी केंद्रावर पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, संचालक गणेश ढोकणे, नारायण लोखंडे, अरुण शिंदे, राजेंद्र सानप, अण्णासाहेब पटारे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *