Headlines

जिल्हा सह. बँक अध्यक्षपदी डॉ. कोरपे, उपाध्यक्षपदी ठाकरे




अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांचे एक- एकच अर्ज आले. त्यामुळे अध्यासी अधिकारी गितेशचंद्र साबळे यांनी अध्यक्षपदी डॉ. जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने जिल्हा बँकेची सत्ता राखत पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. २१ पैकी ११ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक झालेल्या १० जागांवरही सहकार पॅनलनेच बाजी मारली आहे. गुरुवारी झालेल्या सभेत बँकेचे संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे, गोपाल काकड, अजिंक्य राऊत, कल्पना पाचपोर, अरविंद इंगोले, रामेश्वर वाघ, अनिलकुमार जाधव, जावेद खान, हिदायत उल्लाह खान पटेल, डॉ. धीरज देशमुख, उषा हिंगणकर, संदीप खारोडे, अभिषेक तिडके, धनंजय गोरे, शोभा झनक, नितीन जाधव, विश्वनाथ ताथोड, ललीत बहाळे, गीता ठाकरे, अपर्णा धोत्रे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते. निवडणुकीत डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने २१ पैकी १० जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ जागांवरही सहकार पॅनलने वर्चस्व राखले. बँकेवर कोरपे कुटुंबाचे वर्चस्व अकोला वाशीम जिल्हा सहकारी बँकेवर सहकार पॅनलचे १९६५ पासून वर्चस्व आहे. बँकेचे यश व सहकार पॅनलच्या वर्चस्वाचे शिल्पकार हे सहकारमहर्षी डॉ. वामनराव कोरपे मानले जातात. ते १९६५ मध्ये पहिल्यांदा बँकेचे अध्यक्ष झाले व त्यांच्या कार्यकाळात बँकेने प्रगती केली. तो बँकेचा सुवर्णकाळ मानला जातो. अण्णासाहेब कोरपे यांच्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी बँकेचे नेतृत्व सांभाळत वर्चस्व टिकवून ठेवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *