Headlines

‘तो खुर्चीजवळ माझ्या अंगाला स्पर्श होईल असा उभा होता..’:कॉर्पोरेट जिहाद, पीडित तरुणीने सांगितली आपबिती




मला वाटलं होतं की ही मोठी, बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. तिथे आपल्यासाठी चांगल्या कामाचे वातावरण असेल. पण हळूहळू लक्षात आले की तिथे कामापेक्षा माझा धर्म आणि माझ्या विचारांबद्दल जास्त बोललं जातंय. माझ्या मनात माझ्याच धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘जिहाद’पेरला जात असल्याचे वेळीच लक्षात आलं. एवढंच नव्हे तर तौसिफ अत्तार नावाचा प्रोसेस लीडर एकदा माझ्या अंगाला स्पर्श होईल अशा पद्धतीने माझ्या खुर्चीजवळ उभा होता. हे शब्द आहेत नाशिक येथील आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार झालेल्या २५ वर्षीय तरुणीचे. तिने ‘दिव्य मराठी’ला सांगितलेली आपबिती तिच्याच शब्दांत. मी प्रोसेस असोसिएट पदावर होते. प्रोसेस लीडर तौसिफ अत्तारशी नेहमी कामानिमित्त बोलणं होत असे. दुसऱ्या विभागातील काही जणींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी एचआर हेडकडे झाल्याचे माझ्या कानावर आलं होतं. एकदा ऑफिसच्या लॉबीमध्ये मी आणि दोन मैत्रिणी ताक पीत होतो. फोन आल्याने दोघीजणी निघून गेल्यावर दोन पाच मिनिटात तौसिफ आला. बहुतेक तो दोघी जाण्याची वाट बघत असावा. मग मी बसलेल्या खुर्चीजवळ अंगाला स्पर्श होईल असा तो उभा राहिला. माझ्याकडे वेगळ्याच नजरेने एकटक रोखून बघत होता. मी ताक पिताना त्याने ‘क्या पी रही हो’ असे विचारलं. मी त्याला ‘छांस पी रही हूं’ असे सांगितले. तेव्हा तौसिफने स्वत:च्या गुप्तांगाकडे इशारा करून ‘मेरे पास भी छांस है, तुझे चाहिये क्या’ असे विचारत अश्लील हावभाव केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *