![]()
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जल पर्यटन प्रकल्प व अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाचा उद्या तिसरा दिवस असून शासनाने कसलाच प्रतिसाद न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माढा तालुका उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रस्तावित केलेल्या जल पर्यटन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. जल पर्यटन योजनेला सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) धोरणा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर २०१९ ते २०२५ दरम्यान काढण्यात आलेल्या शासन निर्णयांचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रतिनिधी | पंढरपूर कॉरिडॉरच्या नावाने होणारा विध्वंसक विकास नाकारून शहराचा शाश्वत विकास करा. सामान्यांची घरे-दुकाने वाचवण्यासाठी सरकारी मोकळ्या जागांचा वापर व्हावा, या मागणीसाठी ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती’च्या वतीने बुधवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. खादी ग्रामोद्योग भवनपासून सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत प्रांत कार्यालयावर धडकली. खादी ग्रामोद्योग, स्टेशन रोड येथून निघालेली ही रॅली सावरकर पुतळा, जुने बसस्टँड, भोसले चौक, जुने कोर्ट, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जळका वाडा, कालिकादेवी चौक, सीपीडब्ल्यूडी (मध्यप्रदेश) मार्गे सांगोला चौकात पोहोचली. तेथून भाजी मंडई, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज सध्या प्रस्तावित असलेल्या कॉरिडॉर मुळे शहरातील पिढ्यानपिढ्यांचा आध्यात्मिक वारसा, घरे, दुकाने, मठ आणि मंदिरे उद्ध्वस्त होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. हे विस्थापन टाळण्यासाठी सरकारने स्वतःच्या ताब्यातील वर्षानुवर्षे बिगर उपयोगाच्या पडून असलेल्या जागांचा विकास करावा, या मुख्य उद्देशाने ही शोधयात्रा आयोजित करण्यात आली होती. रॅली दरम्यान अशा विविध सरकारी जागांची पाहणी करून त्यांचा विकासासाठी कसा वापर करता येईल, याचे विवेचन करण्यात आले. महाराज चौक, गजानन महाराज मंदिर पिछाडी, संत गाडगे महाराज चौक, यमाई तलाव खालचे पार्किंग, एमटीडीसीचे भक्तनिवास, ब्लड बँक आणि पद्मावती उद्यान पिछाडी अशा विस्तृत मार्गावरून ही फेरी काढण्यात आली. रॅलीचा समारोप प्रांत कार्यालयावर झाला. या ठिकाणी बचाव समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. “पंढरपूरचे पावित्र्य राखून आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान न करता सरकारी जागांवरच विकास व्हावा,” अशी आग्रही मागणी केली. अति.संपादित जमीनींचा प्रश्न कोल्हापूर उच्च खंडपीठात धरण परिसरातील अतिरिक्त संपादित जमिनींचा प्रश्न कोल्हापूर उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना कोणतीही मोजणी अथवा पुढील कारवाई करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या जमिनींवर मूळ मालकांच्या वारसांनी शेती व इतर उपजविकेची साधने उभी केली आहेत. अनेक ठिकाणी घरे, मंदिरे व इतर बांधकामेही अस्तित्वात आहेत. त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. शासकीय जागांचा विकास करा, आंदोलकांची मागणी
Source link
पंढरपूर कॉरिडॉर, उजनी पर्यटन विरोधात एल्गार:अधिकारी आणि पालक मंत्र्यांकडून उपोषणाची दखल नाही