Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाने घडवून आपल्याला‎सांगितले- डू इट युवरसेल्फ‎




देवाने जेव्हा माणसाला घडवले, तेव्हा त्याने माणसाला एक विशेष‎गोष्ट दिली. ती म्हणजे -अमर्याद क्षमता. तत्त्वज्ञानी लोक सांगतात की,‎प्रत्येक माणसाला घडवल्यानंतर देव त्याला पृथ्वीवर पाठवतो. तेव्हा‎तो प्रत्येकाच्या कानात एक गोष्ट नक्की सांगतो. तो म्हणतो की, मी‎तुला काही गोष्टी दिल्या. त्यात सर्वाधिक ‘शक्यता” दिली आहे. पण‎खाली आल्यावर हे विसरून जातो. मग आपण निराश होतो किंवा‎संकटात सापडतो. तेव्हा देव विचार करतो की, मी याला उडण्यासाठी‎पंख दिले. पण हा पंखांचा वापर करत नाहीये. गीतेत एका ठिकाणी‎श्रीकृष्ण म्हणतात, योग्य लोकांची योग्यता हा माझा अंश आहे.‎त्यालाच ‘देवांश” म्हटले गेले. काही दिवसांपूर्वी मी फिनलंडच्या‎दौऱ्यावर एका हॉटेलमध्ये गेल्यावर मी आश्चर्यचकित झालो.‎तिथल्या खोलीत टेलिफोन नव्हता व पाणी गरम करण्याची किटलीही‎नव्हती. सेवा देणारा कर्मचारी नव्हता. असे का, असे त्यांना विचारले,‎तेव्हा ते म्हणाले की, आमच्याकडे नियम आहे- ‘डु इट युवरसेल्फ”.‎फिनलंडचा हा नियम पाहून मला वाटले की, हे लोक खरोखरच‎देवाची आज्ञा पाळत आहेत. कारण परमात्म्यानेही माणूस म्हणून‎घडवताना आपल्याला हेच तर सांगितले- डु इट युवरसेल्फ!‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *