![]()
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतिपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपले राजीनामे दिल्याने, गुरुवारी (९ एप्रिल) पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात, सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.यावेळी सभापती पदासाठी गंगाराम बेलकर तर उपसभापती पदासाठी संदिप सालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने,अध्यासी अधिकारी विकास जाधव यांनी बेलकर व सालके यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड झाल्यानंतर खासदार लंके समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात फटाके, शोभेच्या दारूची आतषबाजी केली.गुलाल उधळत जल्लोष केला. माजी सभापती बाबासाहेब तरटे, किसनराव रासकर, किसन सुपेकर, बापूसाहेब शिर्के,रा. या. औटी, विजय पवार,डॉ.आबासाहेब खोडदे, अशोक कटारिया,चंदन भळगट,मेघा रोकडे,शंकर नगरे,पद्मजा पठारे, बाबासाहेब न-हे,तुकाराम चव्हाण, सचिव सुरेश आढाव बैठकीला उपस्थित होते.
Source link
पारनेर बाजार समिती सभापतिपदी बेलकर:उपसभापतिपदी संदीप सालके बिनविरोध