Headlines

पुरेसा पाऊस, पूरक हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनात 30% वाढ:गतवर्षी 43485 इतकी तर यंदा जिल्ह्यात एकूण 71529 इतकी पेरणी‎


.

मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. शेत जमिनीला वेळेत मशागत न करता आल्याने इतर पिक पेरणीला प्राधान्य न देता शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. पुरेसा पाऊस व पूरक हवामानामुळे यंदा गव्हाचा उतारा चांगला मिळत असून, उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सध्या सुरू असलेल्या राशीवरून दिसते.

त्यामुळे मागील वर्षात जिल्हा प्रत्यक्ष गहू पेरणी ४३४८५ पेरणी इतकी झाली होती. तर यंदाच्या वर्षी जिल्ह्यात एकूण ७१५२९ इतकी पेरणी झाली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचा गहू पेरणीकडे जास्त कल असल्याचे जाणवत आहे.

गतवर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने जिल्ह्यात गव्हाच्या क्षेत्राचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. यंदाच्या वर्षी सर्वत्र बहुतांश शेतजमिनीला अतिवृष्टीमुळे चिबड लागले होते. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. पूरस्थितीनंतर अनेक महिन्यानंतर जमीन मशागत करण्याच्या अवस्थेत आल्या होत्या. त्याच दरम्यान नदी कार्यक्षेत्रामध्ये विद्युत पोलसह ट्रांसफार्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीला अनेक महिने ट्रान्सफॉर्मरकडे जाण्याच्या मार्ग शोधण्याची वेळ आली होती. त्यामुळे इतर उत्पादन घेण्याचा कालखंड निघून गेला होता.

^सीना नदीसह भोगावती नदीला पूर आला होता. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे शेतजमिनीला पाणी लागले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी गहू, हरभरा लागवडीकडे अधिक भर देण्यात आला आहे. यंदा गव्हाला चांगला उतार आहे. ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढले आहे. जगन्नाथ कोल्हाळ, शेतकरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *