Headlines

पेट्रोल पंपावर तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या:माथेफिरू प्रियकराने गळा चिरून संपवले, संभाजीनगरच्या करमाडमधील घटना;VIDEO




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा, लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केला. या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, करमाड येथील गणपती मंदिराजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पूजा सुदाम गावंडे ही तरुणी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. आज दुपारी १२:३० च्या सुमारास ती आपल्या कामात व्यस्त असताना, तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे हा दुचाकीवरून तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक खिशातील धारदार चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या पाठीत बुक्का मारून तिला जमिनीवर पाडले आणि तिच्या गळ्यावर सपासप वार केले. एक व्यक्ती वाचवण्यासाठी आला, पण… या हल्ल्यात पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सत्यम हा पूजावर चाकुने वार करत असताना, पेट्रोल पंपावर उपस्थित एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी पुढे आला, मात्र नराधम सत्यमने त्यालाही चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मागे हटवले. यानंतर सत्यम दुचाकीवर बसून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला असून, आरोपीच्या डोळ्यात माणुसकीचा लवलेशही उरला नसल्याचे त्यात दिसत आहे. प्रेम प्रकरणातील संशय किंवा वादातून खून झाल्याचा अंदाज घटनेची भीषणता पाहून परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी सत्यम गावंडे घटनास्थळावरून फरार झाला. करमाड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, प्रेमप्रकरणातील संशयावरून किंवा वादातून हा पाशवी खून झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला पोलिसांकडून अटक भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारांमध्ये येतेच कसे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. फरार आरोपी सत्यमच्या मुसक्या आवळण्यासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके पाठवली. विविध ठिकाणी छापेमारी करत अखेर आरोपीला कचनेर येथून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा… सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या:वरिष्ठांनी अपमानित केल्याची फिर्याद, आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हा नोंद‎ आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *