Headlines

पोलिस दलास 3 आधुनिक सर्व्हिलन्स वाहने:कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे आता हाेणार शक्य‎




जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिस दलाच्या ताफ्यात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ३ सर्व्हिलन्स वाहने नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या वाहनांचा शुभारंभ ७ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या सर्व्हिलन्स वाहनांच्या माध्यमातून शहरातील संवेदनशील भाग, गर्दीची ठिकाणे, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रभावी देखरेख ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे, तसेच चोरी, दंगल, संशयास्पद हालचाली यांसारख्या घटनांवर वेळीच आळा घालणे शक्य होणार आहे. पोलिस दलात दाखल होणाऱ्या सर्व्हिलन्स व्हेईकलमधील कॅमेरे अंधारातही काम करतील. दाट झाडीत लपलेल्या संशयित या वाहनातील कॅमेरे टिपतील. अकोला पोलिसांना शासनाने अशा प्रकारची तीन वाहने उपलब्ध करून दिली आहेत. एका वाहनाची किंमत साधारणपणे दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. वाहनांमध्ये आधुनिक सुविधा वाहनात हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे ३६० अंशात परिसरावर सतत नजर ठेवण्याची क्षमता असून डिजटस व्हिडिआे रेकॉर्डर प्रणाली व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षितपणे साठवण्याची सुविधा आहे. लाइव्ह मॉनिटरिंग स्क्रीन घटनास्थळी थेट दृश्य पाहण्याची सुविधा, इन्व्हर्टर व बॅटरी बॅकअप प्रणाली वीज नसतानाही अखंडित कार्य क्षमता, वायरलेस कम्युनिकेशन प्रणाली नियंत्रण कक्षाशी सतत संपर्क, नागरिकांना सूचना व जनजागृती संदेश देण्यासाठी पब्लिक अॅड्रेस सिस्टम, मोबाइल नेटवर्क-इंटरनेट कनेक्टिव्हिटी, इमर्जन्सी लाइट व सायरन सिस्टम उपलब्ध आहे. संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे होणार शक्य ^ही वाहने खास पोलिस दलासाठी तयार करण्यात आली आहेत. या वाहनांमध्ये घटनास्थळाचे चित्रीकरण करण्याची सुविधा आहे. शहरातील संवेदनशील भागात अशा प्रकारची वाहने तैनात केली जाणार आहेत. या वाहनांमध्ये असलेले कॅमेरे ३६० अंशात फिरणारे असतील. या वाहनात ड्रोन कॅमेरेही आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. सभा, मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणी हे वाहन तैनात केले जाणार आहे. कॅमेरे पोलिस नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. आहे. – डॉ. अर्चित चांडक , पोलिस अधीक्षक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *