![]()
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “प्रताप सरनाईक यांनी छळल्यामुळे आणि मानसिक त्रास दिल्यामुळेच एका व्यक्तीने आत्महत्या केली,” असा दावा नरेंद्र मेहता यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणीही मेहता यांनी केली आहे. महायुतीमधील दोन नेत्यांमधील या जाहीर वादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीचे पैसे दिले नाहीत, ‘विहंग ग्रुप’वर गंभीर आरोप
नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणाचा सविस्तर खुलासा करताना सांगितले की, “प्रताप सरनाईक यांच्या ‘विहंग ग्रुप’ने संबंधित व्यक्तीची जमीन घेतली होती आणि तिथे ते घरे बांधून देणार होते. मात्र, सरनाईक यांनी या व्यक्तीला त्याच्या हक्काच्या जमिनीचे पूर्ण पैसे दिलेच नाहीत. हक्काचे पैसे मिळत नसल्याने आणि सततच्या मानसिक तणावामुळे अखेर त्या व्यक्तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.” नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या! “एका निष्पाप व्यक्तीचा जीव जाण्याला प्रताप सरनाईक कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांनी आता पदावर राहू नये. त्यांनी तात्काळ नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,” असे नरेंद्र मेहता म्हणाले. या गंभीर आरोपानंतर आता मिरा-भाईंदरसह ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, यावर आमदार प्रताप सरनाईक किंवा शिवसेना काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा.. उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द:भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे पोलिसांच्या ताब्यात; अंबादास दानवेंसह वडेट्टीवारांचाही सरकारवर हल्लाबोल राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा
Source link
प्रताप सरनाईकांवर नरेंद्र मेहतांचा गंभीर आरोप:म्हणाले- तुमच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली, मंत्रिपदाचा राजीनामा द्या