Headlines

प्रशासन सतर्क:चुर्मापुरीतील पुतळे कारखाना अतिक्रमण काढणार, विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा




मोडनिंब येथील दोन्ही महापुरुषांचे पुतळे ग्रामस्थांनी स्वखुशीने गुरुवारी सायंकाळी सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान पुतळे उभा करणारा कोठडीतील मास्टरमाइंड बाळराजे आवारे पाटील याचा चुर्मापुरी (ता.अबंड, जि.जालना) येथील पुतळा तयार करण्याच्या कारखान्याचे अतिक्रमण करुन थाटलेले पत्राशेड हटवण्याचे आदेश तेथील प्रांताधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत. महापुरुषांचे पुतळे विना परवानगी रातोरात उभे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने माढा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गुरुवारी माढा पोलिस ठाण्यात बैठक घेऊन विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा खावी लागेल, असा सज्जड दमच माढा पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी व सपोनि रोहित शिंदे यांनी दिला. या बैठकीसाठी पृथ्वीराज सावंत, दादासाहेब साठे, पीएसआय महम्मद शेख, दिनेश जगदाळे, रवी सरवदे, सुधीर लंकेश्वर, अमर लंकेश्वर, शहाजी ढावरे, शंभूराजे साठे, किरण पवार, नगरसेवक अरुण कदम, बाबा मस्के अरविंद खरात आदी उपस्थित होते. सपोनि रोहित शिंदे यांनी सामाजिक सलोखा बिघडेल किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये अशा सक्त सूचना दिल्या. सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चुर्मापुरीच्या कारखान्यात विविध महापुरुषांचे पुतळे अस्ताव्यस्त पडलेले असून ते निकृष्ट दर्जाचे असल्याची शक्यता आहे. आगामी काळात विविध महापुरुषांच्या जयंती, उत्सव साजरे होणार असून या कालावधीत हे अनधिकृत पुतळे विना परवानगी कोणत्याही ठिकाणी बसवले जाण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी भोकरदन, बुलढाणा व सोलापुरात अनधिकृत पुतळे स्थापनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ते उभे करावेत. महापुरुषांना जातीच्या बंधनात आपण कोणीही अडकवू नये. या पुतळ्यामुळे सामाजिक समता धोक्यात येईल असे वर्तन कोणीही करू नये. आवारे पाटलाविरुद्ध महाराष्ट्रभरात गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल असून १७ फेब्रुवारी रोजी माजलगाव (जि. बीड) येथे झालेल्या शिवस्मारक यात्रेच्या समारोप कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करून महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी कोणत्याही प्रशासनाची परवानगी घेणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच जर पोलिसांनी याला विरोध केला तर “पोलिसांची वर्दी बाजूला ठेवून फटके दिले जातील’ अशी धमकी देऊन पोलिस प्रशासनाला थेट आव्हान दिले होते. दरम्यान, आवारे पाटलाच्या अनधिकृत व बेकायदेशीर कृती आणि चिथावणीखोर वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *