Headlines

मोहोळ येथे सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेला गुरुवारपासून होणार प्रारंभ:रविवार दि.26एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याच्या कार्यक्रमाने होणार सांगता‎




मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस गुरुवार दि.१६ एप्रिल रोजी सकाळी श्री गवई स्वामी अभिषेक व रात्री श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे.तर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याचा कार्यक्रम व प्रसादाने सांगता होणार आहे. मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस दि. १६ रोजी सकाळी श्री गवई स्वामी अभिषेक व रात्री श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे. दि. १७ रोजी सकाळी श्रींस तेल लावण्याचा कार्यक्रम व प्रसाद रात्री वसंत पूजा, गाभाऱ्यातील आरती,चंदन उटी व प्रसाद होणार आहे. शनिवार दि. १८ रोजी रात्री वसंत पुजा,गाभान्यातील आरती, चंदन उटी, प्रसाद व नंतर विनायकबुवा मोहोळकर यांचे प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१९ रोजी चंदन उटी, प्रसादानंतर रघुनाथबुवा रचित, सोमनाथबुवा कुर्डे (महाराज) यांचे चक्रीभजन, रात्री १ वा. श्रीक्षेत्र वडवाळहून श्रींच्या छत्रीचे आगमन, पहाटे ४ वा.श्रींची पालखीसह स्वर्गाची सवाद्य मिरवणुक, भाकणूक व प्रसाद होणार आहे. सोमवार दि. २० रोजी रात्री वसंत पुजा बाहेरील आरती चंदन उटी व प्रसाद तर मंगळवार दि.२१ रोजी रात्री वसंत पुजा बाहेरील आरती चंदन उटी व प्रसाद श्री क्षेत्र नागनाथ महाराज यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १७ रोजी रात्री ८ वाजता हभप कृष्णा महाराज जोगदंड कामरखेडा (लातूर) यांचे भारूड कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. २० रोजी रात्री ८ वाजता हभप माऊली महाराज कदम यांचे किर्तन होणार आहे. मंगळवार दि. २१ रोजी भरत शिंदे (बाळासाहेब महाराज) कांबळेश्वर यांचे किर्तन तर शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत शाहीर राजू बाघमारे व बन्सी कांबळे यांचा कलगी तुरा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. २६ रोजी संत नामदेव भजनी मंडळ मोहोळ यांचा हरिजागर होणार आहे. प्रसाद होणार आहे. बुधवार दि.२२ रोजी सकाळी श्री भिकलिंग महाराजांना अभिषेक व रात्री श्रींची सवाद्य मिरवणूक युज्य भक्त श्री भिकलिंग महाराजांची भेट व नयनरम्य शोभेचे दारूकाम होणार आहे.गुरुवार दि.२३ रोजी सकाळी श्रींची महापूजा दुपारी ४ वा. श्रींच्या पालखीची गणांसह सवाद्य मिरवणूक, भाकणूक व प्रसाद होणार आहे. शुक्रवार दि. २४ रोजी कलगी-तुरे, भेदीक गाणी यांचा सामना दु. ४ वा. कुस्त्यांचा फड,महाप्रसाद व सायं. ६ वा. श्रींच्या छत्रीचे वडवळाकडे प्रस्थान होणार आहे.रविवार दि.२६ रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याचा कार्यक्रम व प्रसाद कार्यक्रमाने सांगता होणार आहे. श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे.यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्तासह स्वयंसेवक बंदोबस्त, भाविकांना स्पीकरद्वारे सूचना संदेश, मोटरसायकल पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग, यात्रेकरूंसाठी बैठक व्यवस्था, व्यापारी दुकानासाठी जागा व्यवस्था, जागोजागी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबरोबरच अति आवश्यक सुविधांचे आयोजन करण्याचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. भक्तांसाठी आवश्यक सोयी- सुविधा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *