Headlines

रुपयाही खर्च न करता शिंदे सेनेने केले खासदार‎:अक्कलकोट येथे खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे नागरी सन्मानात भावनिक उद॰गार‎




शिवसेना पक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय देतात. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ज्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात, त्यांना कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. मी एक रुपयेही खर्च न करता मला खासदार केले. गोरगरिबांच्या घरातील व्यक्तीला मोठे केले. कुठलाही प्रकाराचे अन्याय, त्रास होऊ देणार नाही. तसे झाल्यास मी स्वतः तुमच्या सोबत संघर्षासाठी असणार आहे. अक्कलकोटमध्ये पाटील, तानवडे, म्हेत्रे हे तिन्ही मातब्बर परिवार एकत्र आहेत हे महत्त्वाचे आहे. त्रिशूल तयार झाले आहे. सिद्धाराम म्हेत्रे आमदार, नामदार नसूनही दमदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे कमी असूनही जिंकले आहेत, असे प्रतिपादन नूतन खासदार डॉ.ज्योती वाघमारे यांनी केले. नागरी सत्कार सोहळा व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना अक्कलकोट शहर व ग्रामीणच्यावतीने येथील जुना आडत बाजार येथे बुधवारी सायंकाळी उत्साहात पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, शिवानंद पाटील, सागर पाटील, धानेश अचलेरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, प्रवीण तानवडे, पंचायत समिती सदस्या शीतल म्हेत्रे, दुधनीचे उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार, महिला जिल्हाप्रमुख रवीना राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आनंद तानवडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश सुरवसे यांनी केले. विश्वा जवळगे यांनी आभार मानले. यावेळी व्यंकट मोरे, ॲड. फारिया टिनवाला यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे आजी- माजी पदाधिकारी नेते, कार्यकर्ते, मतदार बंधूभगिनी, म्हेत्रेप्रेमी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते. तालुक्यात द्वेषचे राजकारण सुरू झाले आहे. तानवडे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपा रुजवली पण यांना भाजपने डावलले. सर्वांचे योगदान आहे. हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे. जिद्दीने काम करावे लागणार आहे. गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक ही योजना राबवावे लागणार आहे. मतदार याद्यांचे पुनर्लेखन सुरू आहे. त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. एक महिना चांगले लक्ष द्यावे लागणार आहे. मतदार यादी साठी दक्ष राहा. काम केले तर पदे मिळतील असे सांगितले. सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *