Headlines

वर्षभरात उद्यान देखभालीवर 98 हजार, कर्मचाऱ्यांच्या पगारावर 4.90 कोटी खर्च:महापालिकेच्या 33 पैकी निम्म्याहून अधिक उद्यानात सुविधाच नाहीत‎



शहरात महापालिकेची सुमारे ३३ उद्याने आहेत. त्यापैकी तीन उद्याने खासगी संस्थेकडे देण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित ३० पैकी ठराविक १० ते १५ उद्याने वगळता उर्वरीत उद्याने भकास अवस्थेत आहेत. या उद्यानात नागरिकांना विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी स

.

दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांकडून क्रीडांगणे, उद्याने उभारण्याची, उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून उद्यानांच्या दुरवस्थेचा विषय गंभीर झाला आहे. शहरात महापालिकेची ३३ उद्याने असल्याची नोंद कागदावर आहे. त्यातील गंगा उद्यान, सिद्धीबाग व महालक्ष्मी उद्यान खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहेत. उर्वरित उद्यानांपैकी काही ठराविक उद्याने स्थानिक नगरसेवक व काही संस्था, कंपन्यांच्या पुढाकारातून विकसित झाली. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक उद्यानांची भकास अवस्था झाली आहे. महापालिका सतत आर्थिक अडचणीचे कारण पुढे करते. उद्यानांची देखभाल व तेथील खेळण्यांची दुरुस्तीही महापालिका करत नाही. गेल्या वर्षात उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी फक्त ९८ हजार खर्च झालेत. सावेडी उपनगरात लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या नंदनवन कॉलनी येथील उद्यानाची देखभालीअभावी झालेली दुरावस्था.

वसुंधरा अभियानांतर्गत लाखोंचा खर्च राज्य शासनाच्या वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क विकसित करणे यासारखे उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र, केवळ सर्वेक्षणासाठीच हे उपक्रम राबविले जातात. सर्वेक्षण झाल्यावर याची देखभाल न झाल्याने त्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. महापालिकेने सध्या सुस्थितीत असलेल्या उद्यानांची देखभाल करण्यासाठी ठोस धोरण निश्चित करण्याची गरज आहे.

वृक्ष लागवडीचा पाच कोटींचा खर्च वाया केंद्र शासनाच्या हरित क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांत महापालिकेने ५ कोटी रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केला आहे. यातून २३ उद्याने व सीना नदी काठावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. मात्र, देखभाल न झाल्याने हा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत अनेक नगरसेवक उद्यान विकसित करण्याऐवजी लाखो रुपये खर्चून केवळ सुशोभीकरण करण्यावर उधळपट्टी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *