Headlines

सकारात्मक जीवनशैली घडविण्यासाठी मैदानी खेळांचे महत्व- सुमित कोल्हे:कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीगचे उत्साहात उद्घाटन,मान्यवरांची उपस्थिती‎




व्यस्त जीवनशैलीतून मानसिक ताजेपणा मिळविण्यासाठी आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करण्यासाठी खेळासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. खेळातून सांघिक भावना वाढीस लागून एकोपा निर्माण होतो. म्हणून सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले. कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा संकुल, टाकळी फाटा येथे पार पडले. या सोहळ्यात कोल्हे बोलत होते. माजी सभापती सुनील देवकर उपस्थित होते. कोल्हे पुढे म्हणाले, शिक्षकांसारख्या समाजघटकांसाठी अशा स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून त्या आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैली घडविणाऱ्या ठरतात. यावेळी त्यांनी संजीवनी परिवाराची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करत अशा उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे नेहमी पाठबळ असते. स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या वैद्यकीय सुविधांसाठी संजीवनी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल तसेच संपूर्ण संजीवनी शिक्षण संस्था सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या मैदानावर स्वतः स्व. कोल्हे उपस्थित राहून त्यांनी केलेल्या वृक्षारोपण व संगोपनाची आठवण सांगताना आज या झाडांची सावली म्हणजे जणू त्यांचे आशीर्वादच असल्याची भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.या सामन्यांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघाला अनुक्रमे ७१०१, ५१०१, ३१०१ व २१०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मालिकावीरास ११०० चे बक्षिस आहे. तसेच सर्वाधिक चौकार, उत्कृष्ट गोलंदाज, उत्तम संघ, सर्वाधिक षटकार, उत्कृष्ट झेल, हॅटट्रीक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, अष्टपैलू खेळाडू सामनावीर अशा वर्गवारीतील खेळाडूंना ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहे.याप्रसंगी किरण निंबाळकर, मनोहर शिंदे, महेंद्र विधाते, रमेश दरेकर, शशिकांत जेजूरकर, माणिक कदम, मनोज सोनवणे, विद्या आढाव, सुनील पोरे, दिपक तुंगार, राहुल भागवत, विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, अमोल कडू, मारुती भोईर, सुधाकर निकुंभ, संजय साबळे, नारायण कवडे, गोविंद आढळ आदींसह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *