Headlines

सिंधुदुर्गात 3 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू:दोघेजण थोडक्यात बचावले, वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणातील घटना




राज्यात उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी तरुण जलाशय, विहिरी आणि तलावांवर पोहण्यासाठी गर्दी करत असताना, हा आनंद अनेकदा जीवावर बेतत असल्याच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात घडली असून, तिथे तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोघे जण बचावले असल्याची माहिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात आज बुधवारी सायंकाळी तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. धरणावर अंघोळीसाठी गेलेल्या एकूण पाच जणांपैकी तिघींचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य दोघांना वाचवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून, करुळ धरण परिसरात सध्या नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. वेंगुर्लेतील खोल समुद्रात जाण्यास मज्जाव कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या वेंगुर्ले येथील निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना खोल समुद्रात नेण्यास बंदर विभागाने मज्जाव केला आहे. मान्सूनपूर्व कालावधी जवळ येत असल्याने समुद्रात कोणत्याही क्षणी वादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खोल समुद्रात गेलेल्या प्रवासी बोटींना अपघात होऊन पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून बंदर विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चालू पर्यटन हंगाम संपेपर्यंत कोणाही बोट व्यावसायिकाने निवती लाईट हाऊस किंवा खोल समुद्रात पर्यटकांची सफर घडवून आणू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या सूचनांचे उल्लंघन करून पर्यटकांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कडक इशाराही बंदर विभागाने दिला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *