Headlines

स्वारगेटमध्ये खुनाचा प्रयत्न:वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत




स्वारगेट परिसरात एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा हा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुनी याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो गेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी एका इमारतीच्या तळमजल्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी विशाल दळवी आणि आझिम शेख यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला गुन्हे शाखेने पुढील कारवाईसाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के, विशाल दळवी, शंकर कुंभार, शंकर नेवसे, आझीम शेख, विजयकुमार पवार, ऋषीकेश व्यवहारे आणि सद्दाम तांबोळी यांनी ही कारवाई यशस्वी केली. अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या एका दुकानदाराविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी राहुल डोके (वय २९) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील सुतारदर दवाखान्याजवळ महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत होती. त्या वेळी दुकानाबाहेर प्लास्टिकचे ड्रम ठेवण्यात आले होते. अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी पदपथावर ठेवलेले ड्रम जप्त केले. कारवाई केल्याने अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन कारवाईस विरोध केला, तसेच धमकावले. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दुकानदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *