.

अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक दिवस उजाडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या, गुरुवार दि. १४ मे रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते तब्बल २७८४ कोटी रुपयांच्या विविध रस्ते व पुलांच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. या महामार्गांमुळे अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळण व्यवस्थेशी थेट जोडला जाणार असून व्यापार, पर्यटन आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे हा यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा मार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला जोडणार असल्याने मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच नाशिक- अक्कलकोट आणि वागदरी- तोळणूर मार्गामुळे कर्नाटक सीमावर्ती भागातील संपर्क अधिक वेगवान होईल. मोहोळ- वळसंग मार्ग शहरासाठी ‘बायपास’ म्हणून महत्त्वाचा ठरेल.
प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी वारीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, वाखरी येथील बाजीराव विहीर परिसरातील नियोजनाचा अभाव वारकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावरील कायमस्वरूपी लोखंडी बॅरिकेड्समुळे भाविकांची कोंडी होत असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या आगामी पाहणी दौऱ्यात हा ‘अडथळा’ दूर होणार का, याकडे लाखो भाविकांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लवकरच या मार्गाची पाहणी करणार आहेत. रस्ते विकास महामंडळ आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे वारकऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. गडकरींच्या दौऱ्यात हा बॅरिकेड्सचा प्रश्न आणि महामार्गाच्या निकृष्ट कामाची तक्रार थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यांच्या हस्तक्षेपानंतर दोषींवर कारवाई होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गुरुवारी (१४ मे) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते २७८४ कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व पालखी मार्ग पाहणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर प्रथमच गडकरी दौऱ्यावर येणार असल्याने भाजपकडून जोरदार स्वागत.
वाखरी येथील बाजीराव विहीर मैदानात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अंतिम गोल रिंगण पार पडते. रिंगण संपल्यानंतर लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने कूच करतात, मात्र पूर्व बाजूचा कालव्यावरील पूल अत्यंत अरुंद आहे. सेवा रस्त्याला लोखंडी बॅरिकेड्समुळे चालण्यासाठी अत्यंत कमी जागा उरते. पाऊस पडल्यास निसरड्या रस्त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वारकरी संप्रदायाने व्यक्त केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे हजारो कोटींचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. या दौऱ्यात आमदार कल्याणशेट्टी अक्कलकोट शहराच्या अंतर्गत रस्त्यांसह ‘रिंगरोड’ प्रकल्पासाठी नितीन गडकरींकडे भरघोस निधीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे. गडकरींच्या आगमनापूर्वी शहरातील ए-वन चौक ते शिवपुरी आणि स्वामी समर्थ मंदिर परिसरातील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली.
रिंगण सोहळ्यानंतर लाखो भाविक एकाच वेळी बाहेर पडतात. अरुंद रस्ता आणि बॅरिकेड्समुळे तिथे श्वास घेणंही कठीण होतं. वेळीच हे अडथळे दूर केले नाहीत, तर दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
. नितीन गडकरी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता हेलिकॉप्टरने पंढरपूरहून अक्कलकोटला पोहोचतील. . स्वामी दर्शन: प्रारंभी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन ते शिवपुरी आश्रमाला भेट देतील. . कल्याणशेट्टींच्या घरी भेट: त्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. . मुख्य सोहळा: सायंकाळी ६:३० वाजता नवीन बस स्थानक मैदानावर भव्य भूमिपूजन सोहळा पार पडेल.