![]()
देवाने जेव्हा माणसाला घडवले, तेव्हा त्याने माणसाला एक विशेषगोष्ट दिली. ती म्हणजे -अमर्याद क्षमता. तत्त्वज्ञानी लोक सांगतात की,प्रत्येक माणसाला घडवल्यानंतर देव त्याला पृथ्वीवर पाठवतो. तेव्हातो प्रत्येकाच्या कानात एक गोष्ट नक्की सांगतो. तो म्हणतो की, मीतुला काही गोष्टी दिल्या. त्यात सर्वाधिक ‘शक्यता” दिली आहे. पणखाली आल्यावर हे विसरून जातो. मग आपण निराश होतो किंवासंकटात सापडतो. तेव्हा देव विचार करतो की, मी याला उडण्यासाठीपंख दिले. पण हा पंखांचा वापर करत नाहीये. गीतेत एका ठिकाणीश्रीकृष्ण म्हणतात, योग्य लोकांची योग्यता हा माझा अंश आहे.त्यालाच ‘देवांश” म्हटले गेले. काही दिवसांपूर्वी मी फिनलंडच्यादौऱ्यावर एका हॉटेलमध्ये गेल्यावर मी आश्चर्यचकित झालो.तिथल्या खोलीत टेलिफोन नव्हता व पाणी गरम करण्याची किटलीहीनव्हती. सेवा देणारा कर्मचारी नव्हता. असे का, असे त्यांना विचारले,तेव्हा ते म्हणाले की, आमच्याकडे नियम आहे- ‘डु इट युवरसेल्फ”.फिनलंडचा हा नियम पाहून मला वाटले की, हे लोक खरोखरचदेवाची आज्ञा पाळत आहेत. कारण परमात्म्यानेही माणूस म्हणूनघडवताना आपल्याला हेच तर सांगितले- डु इट युवरसेल्फ!
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाने घडवून आपल्यालासांगितले- डू इट युवरसेल्फ