Headlines

स्रोत स्तरावरील कचरा विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना:बायोमायनिंग, वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा : घनकचरा प्रकल्पाची पाहणी‎




सुकळी कंपोस्ट डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पाची २५० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असून, शहरातून दररोज येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण आणि विलगीकरण बायोमायनिंगद्वारे केले जात असल्याबद्दल माहिती घेण्यात आली. यावेळी मान्यवरांनी ‘स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरण’ या उपक्रमाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. नागरिकांनी घरातूनच ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पर्यावरणपूरक होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. शहरातील नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने महापौर श्रीचंद तेजवानी, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांनी नुकतीच सुकळी येथील घनकचरा व्यवस्थापन (एमएसडब्ल्यू) प्रकल्पाला भेट देऊन विविध विभागांची सखोल पाहणी केली. या भेटीदरम्यान मान्यवरांनी प्रकल्पाच्या एकूण कार्यपद्धतीचा आढावा घेत शहरातून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. प्रकल्पामध्ये ओला कचरा, सुका कचरा, आरडीएफ (रिफ्यूज डिराईव्हड् फ्युअल) आणि इनर्ट अशा विविध प्रकारांमध्ये कचऱ्याचे विभाजन करण्यात येते. यामध्ये विशेषतः ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केले जाते, तर ज्वलनशील स्वरूपातील कचऱ्यापासून आरडीएफ तयार करण्यात येते. हे आरडीएफ दररोज सुमारे १०० मेट्रिक टन प्रमाणात चंद्रपूर येथे पाठवण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय मोठे असल्याचेही त्यांनी नमूद केले. भेटीदरम्यान मान्यवरांनी प्लांटमध्ये उपलब्ध विविध यंत्रसामग्रीची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहिली. कचरा वर्गीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनरी, कन्वेयर सिस्टीम, विलगीकरण प्रक्रिया तसेच आरडीएफ निर्मितीची संपूर्ण कार्यपद्धती याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. प्लांटमध्ये सध्या उपलब्ध आरडीएफ साठा, चंद्रपूरला पाठविण्यात आलेल्या आरडीएफचे प्रमाण आणि भविष्यातील व्यवस्थापनाबाबतही चर्चा करण्यात आली. वैज्ञानिक पद्धतीने विकसित करण्यात येत असलेल्या लँडफिल साईटची मान्यवरांनी पाहणी केली. भविष्यातील कचरा व्यवस्थापन लक्षात घेऊन पर्यावरणीय नियमांचे पालन करत लँडफिल विकसित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय बायोमायनिंग प्रकल्पालाही भेट देऊन पुनर्वापर आणि विल्हेवाटीचे काम कशाप्रकारे सुरू आहे, याचा आढावा घेण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *