![]()
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, डॉक्टर अभिमन्यू तरकसे दररोज सकाळी अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात होते. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी गेले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमलेल्या मोठ्या बिस्लेरीची पाण्याची बाटली बांधली होती. पण काही वेळानंतर सकाळी 6.30 च्या सुमारास तलावातील सांडव्याच्या बाजूला स्थानिकांना एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी जवळ जाऊन त्याची खात्री केली असता, हा मृतदेह डॉक्टर तरकसे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण काय हे कळणार डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. तरकसे यांच्या डॉक्टर मित्रांनी व प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचना केला. त्यानंतर पुढील सोपस्कारासाठी मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणला. तिथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेन अहवालानंतरच डॉक्टर तरकसे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? त्यांना पोहताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही घडले? याचा तपास केला जाणार आहे. पण एका अत्यंत हुशार डॉक्टराचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर अभिमन्यू तरकसे हे अंबाजोगाई लगतच्या धावडी गावचे रहिवासी होते. त्यांचे प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत हलाखीच्या स्थितीत झाले. या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत चांगले यश मिळवले. त्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातूनच वैद्यकीय पदवी घेतली. पुढे याच महाविद्यालयातून त्यांनी भूलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आता ते तिथेच ज्युनिअर निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते.
Source link
SRT वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागप्रमुखांचा मृत्यू:अंबाजोगाई येथील काळवीट साठवण तलावात पोहताना मृत्यूने गाठले