Headlines

Maharashtra Bahujan Kalyan Department Launches STEM Initiative With IISER Pune



राज्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढीसाठी ‘स्टेम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्मयातून विद्यार्थ्यांच्या मनात असलेली गणित व विज्ञान विषयाची भिती दूर करुन गुणवत्तावाढी

.

राज्यात इतर मागास व बहूजन कल्याण विभागाच्या 980 शाळा आहेत. यामध्ये निवासी व अनिवासी शाळा असून यामध्ये सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शाळेची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणित विषयांविषयी आवड निर्माण व्हावी, पाठांतराऐवजी प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाची गोडी वाढावी. तसेच आश्रमशाळांनी शैक्षणिक गुणवत्तेची अधिकाधिक उंची गाठावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

विज्ञान आणि गणित हे विषय केवळ पाठ्यपुस्तकांतील सूत्रे, व्याख्या आणि संकल्पनांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेले पाहिजेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अनेकदा विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना किंवा गणितातील सूत्रे विद्यार्थ्यांना अवघड वाटतात. ही भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि स्वतः प्रयोग करून पाहण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कृतीयुक्त अध्ययन – अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे.

त्यानुसार पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हास्तरावर विषय शिक्षकांना या उपक्रमाची माहिती व प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात हिंगोली व धाराशिव जिल्हयात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून टप्याटप्याने राज्यातील सर्व जिल्हयात विषय शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी संबंधित शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाणार आहे. या कार्यशाळेतून शिक्षकांना विज्ञान व गणित अध्ययन – अध्यापनाच्या आधुनिक आणि प्रयोगशील पद्धतींची ओळख करून देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे प्रयत्न- मुळे

संचालक इतर मागास व बहुजन कल्याण विभाग पुणे सोनाली मुळे म्हणाले की, STEM म्हणजे विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering) आणि गणित (Mathematics). या चारही क्षेत्रांतील संकल्पनांचा परस्परसंबंध स्पष्ट करून विद्यार्थ्यांना प्रयोग करणे, निरीक्षणातून निष्कर्ष काढणे आणि समस्यांवर उपाय शोधणे यासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न आहे. ‘कृतीतून शिक्षण, अनुभवातून आकलन आणि जिज्ञासेतून संशोधन’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *