![]()
यंदा जिल्ह्यात पावसाने दगाफटका केल्यामुळे बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ५ लाख १८ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख ११ हजार ९६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हा नुकसानीचा विस्तृत अहवाल लवकरच राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. मागील वर्षीच्या निकषानुसार शासनाने मदत जाहीर केल्यास, जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ७३४ कोटी ४८ लाख ६२ हजार २६३ रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. पावसाच्या अभावामुळे यंदा खरिपाचे मुख्य पीक असलेले सोयाबीन तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन उभे होते, त्यांच्याही उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यापाठोपाठ कपाशी आणि तूर ही पिकेही पाण्याच्या अभावामुळे पूर्णपणे सुकण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिक जलस्रोत अंतिम घटका मोजत आहेत. त्यामुळे रब्बीचा हंगाम यंदा जवळजवळ अशक्य झाला आहे. तीन आठवड्यांपूर्वी शासनाने जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत दुष्काळ घोषित केला होता. मात्र प्रत्यक्ष पंचनाम्यानंतरच मदतीचे स्वरूप निश्चित करण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक आणि ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. या संयुक्त पंचनाम्यांनुसार जिल्ह्यातील ५ लाख १८ हजार ७७ शेतकरी दुष्काळाने बाधित झाले आहेत. बागायती व फळपिके: बागायती व फळपिके घेणाऱ्या ४,११० शेतकऱ्यांचे २,९५७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. हेक्टरी १७ हजार रुपये या दराने या शेतकऱ्यांना ५ कोटी २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. मात्र त्या संदर्भातील अंतिम निर्णय शासन घेणार आहे. कोरडवाहू क्षेत्र: जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कोरडवाहू क्षेत्राचे झाले आहे. ४ लाख ३५ हजार ७०५ शेतकऱ्यांचे ६ लाख १८ हजार ४२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. गेल्या वर्षीच्या निकषानुसार (हेक्टरी ८,५०० रुपये) या शेतकऱ्यांना ५२५ कोटी ६६ लाख ३७ हजार २८८ रुपयांची मदत आवश्यक आहे. जिल्हाभरातील बाधित शेतकरी व अपेक्षित भरपाईचा तपशील असा फळबागांचे अतोनात नुकसान: जिल्ह्यात ७८ हजार ३६२ शेतकरी फळपीक घेणारे असून, ९० हजार ५७५ हेक्टरवरील फळबागा सापडल्या आहेत. मागील वर्षाच्या हेक्टरी २२,५०० रुपये निकषाप्रमाणे शासनाने मदत केल्यास २०३ कोटी ७९ लाख ४१ हजार १०० रुपयांच्या निधीची गरज आहे.
Source link
5.18 लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका:सुमारे 734 कोटींची गरज, 5.18 लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचाफटका; सुमारे 734कोटींची गरज