Headlines

भक्ती, संस्कृती, उत्साहाचा संगम; भूमी फाउंडेशनचा पुढाकार:उत्कृष्ट वेशभूषा व सादरीकरणाला दाद; गरबा महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद‎




शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भूमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य गरबा महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित महोत्सवाच्या नवव्या वर्षात भक्ती, संस्कृती, उत्साह आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विनामूल्य प्रवेश, लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आकर्षण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थितीमुळे हा महोत्सव विशेष आकर्षण ठरला. महोत्सवात गरबा स्पर्धेतील विजेत्यांना दास मोबाइलच्या वतीने विविध आकर्षक बक्षिसांसह चांदीच्या प्रतिमा प्रदान करण्यात आल्या. यावेळी अकोटमधील प्रसिद्ध रील स्टार्स, गरबा स्पर्धेचे परीक्षक तसेच भूमी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गटाचे) उपनेते गोपीकिशन बाजोरिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला ग्रामीण जिल्हा संघचालक मोहनराव आसलकर, दास मोबाइलचे संचालक रितेश मिर्झापुरे, वास्तुशिल्पकार नवनीत सेठ लखोटिया,जयपूर साडी सेलचे संचालक सचिन भुस्कट, प्रमोद चांडक, न.प.चे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, सहाय्यक पोलिस अधीक्षक निखिल पाटील, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीकृष्ण गुट्टे, डॉ. दिनेश नागमते, छावा संघटनेचे शंकरराव वाकोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा काँग्रेस नेते प्रशांत पाचडे, ब्युटीशियन सागर गवळी, संपादक सतीश बापू देशमुख, मंगेश चिखले, नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती नयना विशाल इंगोले, दीपक बोडखे, डॉ. विशाल इंगोले, मिलिंद नितोने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा चंचल पितांबरवाले यांच्या सामाजिक कार्यात खंबीर साथ देणाऱ्या मंगलाबाई पितांबरवाले यांचा विशेष गौरव करण्यात आला. यासोबतच अकोटमधील रिल स्टार्स रेणुका उसरू, गायत्री पिपराळे, रुपेश इंदोरे, आदित्य गोटवाल यांचा सन्मान करण्यात आला. गरबा स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या स्मिता जीवानी, अविनाश अबुलकर, अनिकेत डोंगरदिवे यांचाही गौरव करण्यात आला. भूमी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणारे अमोल पवार, जितेश गलाडे, सुमेध खडारे, स्मिता महल्ले, भावना रेवस्कर, सचिन वानखडे, प्रशांत बेराड, संदेश चौडेकर, शुभांगी बरेठिया, पूजा राठोड, अजय तेलगोटे, कीर्ती पितांबरवाले, गौतम मुळे यांचाही सत्कार करण्यात आला. विविध विजेत्यांचा गौरव गरबा स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रुप, उत्कृष्ट जोडी आणि उत्कृष्ट गरबा खेळाडू अशा विविध गटांत स्पर्धकांनी आपली कला सादर केली. अनया मोरे, अनुष्का वर्मा, नवदुर्गा ग्रुप, डोडिया ग्रुप, आदिशक्ती ग्रुप, चोखलिया ग्रुप, प्रेरणा मोरे, अलका टावरी यांच्यासह नमूद स्पर्धक व समूहांनी विविध गटांत विजेतेपद पटकावले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *