Headlines

श्रद्धा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, देवीचा गोंधळ:मोहोळमध्ये शोभायात्रेत साडेतीन शक्तिपीठांसह रामायणातील देखावे लक्षवेधक


.

श्रद्धा शिक्षण संकुलाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त आयोजित शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे हुबेहूब देखावे, रामायणातील पात्रांचे सजीव सादरीकरण, घोड्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील कलाविष्काराने शोभायात्रेने मोहोळकरांचे लक्ष वेधले. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम या शोभायात्रेत पाहायला मिळाला. शोभायात्रेची सुरुवात घोड्यावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्वरूपाने झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे आकर्षक देखावे सादर करण्यात आले. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीतेसह भक्त हनुमान यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी रामायणातील प्रसंग जिवंत केले. या देखाव्यांतून भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरेतील पौराणिक कथांचे प्रभावी दर्शन घडले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संबंधित सर्वांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा उपक्रम उत्साहात पार पडला.

अक्कलकोट। येथील भारत गल्ली नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने ‘प्रताप हिरकणीचा’ या विषयावर आधारित भव्य जिवंत ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला आहे. ऐतिहासिक किल्ल्याच्या संकल्पनेवर आधारित या देखाव्यात प्रदीप साखरे यांच्या कलारत्न फाउंडेशन टीमचे १० कलाकार सहभागी झाले असून, त्यांच्या सजीव अभिनयातून हिरकणीच्या धाडसाची आणि मातृत्वाच्या सामर्थ्याची प्रेरणादायी गाथा सादर करण्यात आली आहे. हिरकणीची कथा ही केवळ एका मातेच्या प्रेमाची गोष्ट नसून संकटांवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. साकारण्यासाठी मंडळाचे बालाजी पाटील, स्वामीराव मोरे, धनंजय गडदे, विश्वजीत पाटील, महेश दणके, विकास आळंद, सागर शिंदे, विशाल पाटील, आकाश विभुते, रविराज बणजगोळ, महेश भोसले आदी सदस्य परिश्रम घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *