![]()
बँक खात्यात पुरेशी रक्कम असतानाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुर्डुवाडी शाखेच्या भोंगळ कारभारामुळे एका खातेदाराचा १४ लाख रुपयांचा धनादेश तब्बल चार वेळा चेक बाऊन्स केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या या चुकीमुळे खातेदाराचा लाखो रुपयांचा जमिनीचा व्यवहार अडकलाच होता. शिवाय त्यांना कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संतप्त खातेदाराने बँकेकडे १० हजार रुपयांच्या भरपाईची मागणी करत थेट आरबीआय’ लोकपालाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान असाच अनुभव माधुरी देशमुख यांना ही आला आहे. कुर्डुवाडी येथील एसबीआयचे खातेदार अजित वायचळ यांनी संबंधित जमीन मालकाला जमिनीच्या व्यवहारापोटी ५८३८०६ या क्रमांकाचा १४ लाख रुपयांचा चेक दिला होता. खात्यात पुरेसा बॅलन्स उपलब्ध असतानाही बँकेने २४ सप्टेंबर, २७ सप्टेंबर, १ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चेक “रेफर टु ड्रावर” असे कारण दाखवून लागोपाठ चार वेळा बाउन्स केला. वारंवार चेक बाउन्स झाल्याने संबंधित शेतक-याने व्यवहार रद्द करत असल्याचे सांगून खातेदारावर एनआयॲक्ट कलम १३८ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. ज्यामुळे खातेदाराला मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ^ग्राहकांना बँक खाते तांत्रिकतेबद्दलची माहिती दिली जाते. तांत्रिक विषय असेल तर ग्राहकांना कळवतोच. चेतन पिंपलीकर, मॅनेजर , बँक ^मी १४ लाखाचा दिलेला चेक पास झाला नाही. रेफर टु ड्रावर म्हणून दोनदा परत आला, याबाबत बँकेकडे विचारणा केली. समाधानकारक उत्तर नव्हते. शेवटी आरटीजीएसने रक्कम पाठवली. इतर बँका चेक लागल्यावर पास करायचा का फोन करतात? अधिकचे पैसे गेल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. -माधुरी देशमुख, निमगांव, टेंभुर्णी बँक खातेदार. ^मी लेखी तक्रार केल्यापासून अद्याप मला बँकेकडून फोनद्वारे, मेसेजद्वारे, लेखी, ईमेलद्वारे प्रतिसाद मिळाला नाही. -अजित वायचळ, बँक खातेदार. खातेदारांच्या या आहेत प्रमुख मागण्या . चेक बाउन्सचे स्पष्ट व लिखित कारण, शिल्लक रकमेचा तपशील द्यावा. . बँकेच्या चुकीमुळे कपात केलेले चेक बाउन्स चार्जेस परत करावेत. . मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल १० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. . बँकेने तक्रारीची दखल न घेतल्यास, लोकपालांकडे तक्रार नोंदवण्यात येईल. चेक दोनदा परत, आरटीजीएसने रक्कम पाठवली आरबीआय ’लोकपाल’कडे ग्रहकांना तक्रार येते नोंदवता बँकेने ३० दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण केले नाही किंवा समाधानकारक उत्तर दिले नाही, तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या cms.rbi.org.in या पोर्टलवर ऑनलाईन किंवा टोल-फ्री क्रमांक १४४४८ वर मोफत तक्रार नोंदवू शकता. बँकेने चेक नाकारल्यास ‘रिटर्न मेमो’ मिळवणे आवश्यक असते. त्यावर अधिकृत तांत्रिक कारण नमूद केलेले असते. खातेदार व चेक धारक यांच्या हस्ते शुल्क वसूल या प्रकाराबाबत खातेदाराने बँकेत जाऊन विचारणा केली असता, “सर्व काही वरून होते, आमच्या हातात काही नाही” असे बेजबाबदार उत्तर बँक कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला दिले. विशेष म्हणजे, बँकेच्या या चुकीमुळे खातेदार आणि चेक प्राप्त कर्ता या दोघांच्याही खात्यांवरून चेक बाउन्सचे शुल्क वसूल करण्यात आले आहे.
Source link
स्टेट बँक खात्यात ठेव असताना 14 लाख रुपयांचा चेक बाउन्स:कुर्डुवाडी स्टेट बँकेविरुध्द आरबीआयकडे तक्रार करणार- अजित वायचळ