Headlines

उजनीचे पाणी उद्योजकांना नको शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा:एआय डाटा सेंटर, पाणीप्रश्नी धरणग्रस्तांनी घेतली आ. पवार यांची भेट‎




उजनी धरणातील पाणी हे सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे आहे. हे पाणी एआय डेटा सेंटरसह विविध औद्योगिक प्रकल्पांसाठी वळवण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून धरणग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची जामखेड येथे प्रत्यक्ष भेट घेतली. शेतकरी, मच्छीमार, कामगार, मजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे आश्वासन रोहित पवार यांनी दिले. उजनी धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती, पिण्याच्या पाण्याची गरज आणि मच्छीमारांचा रोजगार अवलंबून आहे. अशा परिस्थितीत एआय डेटा सेंटर, सोलर प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, न्यूक्लियर पॉवर प्रकल्प आणि बॅटरी प्रकल्पांसाठी पाण्याचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून शेतकरी व मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या पाण्याच्या हक्कावर गदा येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. उजनी धरणग्रस्तांच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याबाबत योग्य भूमिका घेण्याची सूचना दिल्या. तसेच उजनी धरण विभागाच्या अभियंता सुचित्रा डुंबरे यांच्याशी जामखेड येथून दूरध्वनीवर संपर्क साधून सुरू असलेल्या एआय डेटा सेंटरचे काम बंद करण्याची मागणी केली. येत्या २३ ऑक्टोबर पासून आपण स्वतः शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन एआय डेटा सेंटरला विरोध करणार असल्याचे रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील धरणग्रस्त शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उजनीच्या पाण्याबाबत स्थानिकांच्या हक्कांना प्राधान्य मिळावे आणि प्रकल्पांबाबत शेतकरी-मच्छीमारांना विश्वासात घ्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकरी-मच्छीमारांसाठ ी रस्त्यावर उतरू : रोहित पवार उजनी धरणातील पाणी हा शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचा प्रश्न आहे. एआय डेटा सेंटर किंवा अन्य औद्योगिक प्रकल्पांसाठी पाण्याचा वापर करताना स्थानिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडल्याचे धरणग्रस्तांनी सांगितले. या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि मजूर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गरज पडल्यास धरणग्रस्तांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले. हक्काचे पाणी पळवले जाणार असेल तर शांत बसणार नाही उजनी धरणाच्या पाण्यावर आमच्या शेतीचे आणि अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे गणित अवलंबून आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळाले नाही, तर पिकांचे नुकसान होते आणि कुटुंबांवर आर्थिक संकट येते. मच्छीमारांचाही रोजगार उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांसाठी पाण्याचा वापर करण्यापूर्वी शेतकरी आणि मच्छीमारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. सर्व धरणग्रस्तांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा. – अविनाश सरडे, शेतकरी, चिकलठाण, ता. करमाळा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *