![]()
पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी पार पडली. या खटल्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतली. उलटतपासणीदरम्यान, सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दावे मान्य केले. त्यांनी कबूल केले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही पुस्तके इतरांच्या नावाने प्रकाशित केली होती. तसेच, इतर लेखकांनी सावरकरांच्या नावाने पुस्तके प्रकाशित केली असण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. सावरकरांच्या नावावर असलेल्या सर्व लिखाणाबाबत स्वतःला संपूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले. ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सरकारने बहाल केलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्टपणे कबूल केले. ही पदवी जनतेकडून बहाल करण्यात आली असावी, परंतु त्याचा कोणताही अधिकृत किंवा कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सर्वप्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी त्यांच्या चरित्रग्रंथामध्ये वापरली होती. रानडे यांनी ही पदवी त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून दिली होती किंवा कसे, याची आपल्याला माहिती नसल्याचे सात्यकी सावरकर यांनी नमूद केले.या खटल्याची पुढील नियमित सुनावणी 13 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. जुन्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल जुन्या वादातून महिलेला व तिच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष इंद्रजीत जाधव (32, रा. गणेशनगर, आव्हाळवाडी रोड, वाघोली), सागर सातव (रा. श्रावणी हॉटेल, लोहगाव रोड, वाघोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अश्र्वनी लक्ष्मण उघडे (37, रा. विकास सातव यांच्या भाडेतत्वावरील खोली, गणेशनगर, आव्हाळवाडीरोड, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Source link
स्वातंत्र्यवीर ही पदवी सरकारने दिलेली नाही:जनतेने बहाल केली असावी, पण कोणताही अधिकृत पुरावा नाही- सात्यकी सावरकर