![]()
कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते. त्यामुळे बरेचदा असे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शासन त्यांना धरणाचे पाणी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून शासनाने योग्य ती उपाययोजना
.
प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात. अनेकजण विस्थापित होतात. मात्र विस्थापितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन होत नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला संघर्ष येतो. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आवश्यक असते. अप्परवर्धा धरणग्रस्तांसाठी असाच लढा प्रा. साहेबराव विधळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने दीर्घकाळ दिला. त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला. ही बाब प्रकल्पग्रस्तांच्या न्यायलढ्याच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची आहे.
यावेळी बोलताना नागेश चौधरी म्हणाले, आज संधीप्राप्त लोक समाजविन्मुख आयुष्य जगण्यावर भर देत आहेत. मात्र प्रा. साहेबराव विधळे यांनी कायम समाजसन्मुख भूमिका अंगीकारून कार्य केले. धरणग्रस्तांचा लढा असो की बहुजन संघर्ष समितीचे प्रबोधनाचे कार्य असो, सर्वांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेऊन गुणात्मक कार्य केले. आचार्य वेरुळकर गुरुजी म्हणाले, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये पीडित व्यक्तीच्या संघर्षात उभे राहण्याची प्रेरणा आहे. प्रा. साहेबराव विधळे यांनी विविध चळवळींमध्ये केलेले कार्य असेच असल्याने ते अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडे म्हणाले, प्रा. साहेबराव विधळे यांचे जीवनकार्य हे कष्टकरी, बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी राहिले आहे. धरणग्रस्तांच्या सोबतीने त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. मंडल आयोगाच्या प्रबोधन कार्यात हिरीरीने पुढाकार घेतला. तसेच बहुजन संघर्ष समितीतही कार्य केले. फुले-शाहू-आंबेडकरांच ्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी मागील पन्नास वर्षे केलेले सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा हा सत्कार एक प्रकारे नव्या सामाजिक चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. सूत्रसंचालन पूजा गावंडे आणि पल्लवी वानखडे यांनी केले. आभार डॉ. संतोष यावले यांनी मानले. प्रारंभी अहाना पाटील आणि अधिराज या दोन चिमुकल्यांनी गीत गायन केले.
इतर चळवळीतील पुढाऱ्यांचाही सत्कार यावेळी सुरेशराव बोरकर, दिवाकर शंभरकर, बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचे माणिकरावजी गंगावणे, बबलू दुर्गे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सतीश चौधरी, ओमप्रकाश कुटेमाटे या सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. भारत पाटणकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रा. साहेबराव विधळे आणि डॉ. प्रतिभा विधळे यांना मानपत्र व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.