![]()
पुणे येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘सहकार महोत्सवा’च्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान लाभले असल्याचे मत व्यक्त केले. सहकार क्षेत्राला लाभलेल्या सहकार भारतीच्या नेतृत्वामुळे ही चळवळ सर्वार्थाने प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले. सहकार भारती पुणे विभाग आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेला हा महोत्सव रविवार, १२ एप्रिलपर्यंत सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाशेजारील कलाग्राम येथे सुरू राहणार आहे. कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी किंवा ती लयास जाण्यासाठी तिचे नेतृत्व महत्त्वाचे असते. सहकार भारतीच्या सक्षम नेतृत्वामुळेच सहकार चळवळ अधिक बळकट झाली असून तिला योग्य दिशा मिळाली आहे, असे अनास्कर यांनी नमूद केले. यावेळी सहकार भारती पुणे महानगराचे अध्यक्ष सीए दिनेश गांधी, अस्तित्व फाउंडेशनच्या संचालक डॉ. राजश्री जायभाये, सहकार भारती राष्ट्रीय प्रकाशन प्रसिद्धी प्रमुख भालचंद्र कुलकर्णी, राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर, सहकार भारती पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर, पुणे जिल्हा गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सहकार महोत्सवाचे प्रमुख श्रीकृष्ण घोलप, सहकार भारती पुणे जिल्हा बँक प्रकोष्ठ प्रमुख सीए डॉ. केतन जोगळेकर, सहकार भारती राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख शिरीष देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. रवींद्र शिंगणापूरकर, सहकार भारती ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनायक तांबे, सहकार भारती पिंपरी चिंचवड महानगरचे अध्यक्ष दशरथ जाधव आणि सहकार भारतीचे प्रदेश कोषप्रमुख औदुंबर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Source link
सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान:विद्याधर अनास्कर यांचे मत, तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन