![]()
मान्सूनने बुधवारी महाराष्ट्र व्यापला. गत २४ तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी, नाशिक, जळगाव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. संभाजीनगर जिल्ह्यात ४८ तासांत २१.८ मिमी, ५ मंडलात अतिवृष्टी झाली. तर शहरात मान्सूनच्या आगमनानंतर २० तासात ३५.२ मिमी पाऊस पडला. जालन्यात सर्वाधिक १०९ मिमी पाऊस पडला. राज्यात २८ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम असे, हवामान खात्याने म्हटले. पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर या ६ जिल्ह्यांना गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट, तर संभाजीनगर, बीड, नांदेडमध्ये यलो अलर्ट आहे. अरुणाचलमध्ये वाहून आला ढिगारा: २० घरे उद्ध्वस्त, ३ बेपत्ता, मदतीसाठी पोहोचले वायुदल इटानगर | गेल्या २४ तासांत ७२.८ मिमी पाऊस झाल्याने अरुणाचल प्रदेशातील परिस्थिती बिघडली आहे. यामुळे केयी पान्योर जिल्ह्यात पुरासोबत आलेल्या ढिगाऱ्यात १८ घरे वाहून गेली. ३ पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. पान्योर लोअर हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टलाही पुराचा फटका बसला आहे. येथे मदतीसाठी वायुदल पोहोचले. मध्य प्रदेशात व गुजरातमध्ये पोहोचला मान्सून मान्सूनने बुधवारी गुजरात आणि मध्य प्रदेशात प्रवेश केला. गेल्या एल निनो वर्षात म्हणजेच २०२३ मध्येही मध्य प्रदेशात २४ जूनला त्याने धडक दिली होती आणि दुसऱ्याच दिवशी संपूर्ण राज्यात पसरला होता. या वेळी ३-४ दिवस लागू शकतात. सध्या मान्सूनने बिहार, छत्तीसगड, झारखंडच्या काही जिल्ह्यांत धडक दिली. जालन्यात सर्वाधिक १०९ मिमी पाऊस; राज्यात २८ जूनपर्यंत पाऊस संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात खडकी नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला. सोयगाव-जळगाव राज्य मार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प होती. मुंबई… अतिवृष्टीने रस्त्यांना नद्यांसारखे स्वरूप, खड्डे -नाले तुंबले मुंबईत गत ४८ तासांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारीही अतिमुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेले दिसले. नाले तुंबल्याने नागरिक आणि प्रशासनाचीही तारांबळ उडाली.
Source link
आता जोरदार पाऊस:संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासात 21 मिमी पाऊस; 6 जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट, जालन्यात सर्वाधिक 109 मिमी पाऊस