![]()
देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून, हा उपवर्गीकरणाचा घाट कोणत्याही परिस्थितीत हा
.
या मोर्चात ५ हजारपेक्षा जास्त आंबेडकरी जनसागर रस्त्यावर उतरणार असून, तालुक्यातील सामाजिक व राजकीय वातावरण या निमित्ताने कमालीचे तापले आहे.
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या सरकारच्या धोरणाविरोधात तिवसा तालुक्यातील समाज बांधव अत्यंत आक्रमक झाले आहेत. ५९ जातींना एकसंघ ठेवण्याच्या उद्देशाने काढण्यात येणारा हा मोर्चा केवळ आंदोलन नसून, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि सरकारच्या जातीवादी धोरणांचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेली लढाई असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यातील प्रत्येक गावात आणि बौद्ध विहारांमध्ये युद्धपातळीवर जनजागृती केली जात आहे.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या ऐतिहासिक एल्गार मोर्चाची सुरुवात होईल. या मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे भीम सैनिक महापुरुषांची वेशभूषा करून यामध्ये सामील होणार आहेत. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय राजकीय नेते, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते पक्षभेद विसरून या आंदोलनात एकवटणार आहेत. पत्रकार परिषदेला अनिल थूल, प्रशांत कांबळे, संदीप चक्रनारायण, सागर भवते, जानराव मनोहर, राजेंद्र शेंडे, भारत दाहाट, दिलीप जवंजाळ, संदीप दाहाट, प्रशिक शापामोहन आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आरक्षणाचे उपवर्गीकरण नुकसानदायक महाराष्ट्रातील ५९ जाती आजवर गुण्यागोविंदाने एकत्र राहत आल्या आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या या जातींमध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणे लावून १३ टक्के आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले, तर ५९ जातींमधील एकाही घटकाचे शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उत्थान होणार नाही, ते पूर्णपणे रखडेल. म्हणूनच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तालुक्यातील ५९ जातींनी मोठ्या संख्येने या एल्गार मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केले आहे.