![]()
अर्थ विषयक अभ्यासक आणि प्रसिद्ध उद्योजक अभियंता डॉ. डी. एस. काटे यांच्या वतीने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत शहरातील विविध स्मशान भूमीत अविरत सेवा देणाऱ्या चाळीसहुन अधिक स्मशान जोग्यांचा सत्कार पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. या वेळी डॉ. डी. एस. काटे म्हणाले की, कधी न केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधून पहिल्यांदाच होत आहे. काम कुठलेही असो श्रेष्ठत्व हे कामावर अवलंबून नसते तर ते मनुष्यपणावर अवलंबून असते. समाजसेवेचा वसा हाती घेतल्यास तो निस्वार्थपणे पार पडावा आणि खऱ्या अर्थाने समाजातील गोर-गरिबांची सेवा घडावी असे सांगत हा उपक्रम सामाजिक भावनेतून नागरिकांनी आपापल्या विशेष दिनी राबवावा असे त्यांनी आपली भावना व्यक्त करतांना स्पष्ट केले. डॉ. डी.एस. काटे यांची अर्थ तज्ञ म्हणून एक वेगळी ओळख असून त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या विविध प्रकाशित पुस्तक, ग्रंथ हे देशाची अर्थ व्यवस्था मजबूत करण्यासाठी संजीवनी देणारी ठरली आहे. अर्थदिशा, अर्थजागर, अर्थसंपदा, अर्थनीती या पुस्तकांचे लेखन केल्याने विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सद्द: स्थितीत सर्व क्षेत्रात सातत्याने होत असलेले बदल, त्यातून बदलत जाणारे अर्थ नियोजन आणि निर्माण होणारे विविध प्रश्न या सर्वांचे सामान्य वाचकांना सर्वांगीण आकलन व्हावे आणि त्याचा त्यांनी फायदा आकारून घेत आपले जीव समृध्द करावे असा त्यांचा प्रयत्न आहे. व्यवहार आणि पैशांचा विनियोग याविषयी योग्य समज त्यांच्या विविध पुस्तकातून आजही वाचकांना उभारी देत आहेत. डॉ. डी. एस. काटे यांनी शहरातील स्मशान जोग्याना आपल्या आनंदात सहभागी करून घेत त्यांचा सहकुटुंब गौरव केला. आयुष्याच्या शेवटीही स्मशानभूमीत साथ देणारा स्मशान जोगी नेहमीच आनंदाच्या क्षणी दुर्लक्षित राहिला आहे. रक्ताची नाती सोडून जाणारी मानसिकता असलेल्या या समाजात स्मशान जोगी मात्र स्मशानात आलेल्या कुटुंबाचे सांत्वन करून राख होईपर्यंत हे जग सोडून गेलेल्या माणसाच्या सोबतीला असतो. इतरांच्या दुखाबरोबरच आपलेही दुख: पोटात घालून स्मशान जोगी कायम त्या स्मशानात दुखा:च्या छायेत वावरत असतो. आणि म्हणूनच एक सामाजिक दायित्व म्हणून या स्मशान जोग्यांच्या चेहऱ्यावर सुखाचे हास्य फुलवण्यासाठी डॉ. काटे यांच्या स्मशान जोग्यांचा भव्य सत्कार केला. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, शेषराव चव्हाण, मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे, एकनाथ जाधव, सुभाष पाटील, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, कवी विष्णू सुरासे, ॲड. अजित काळे, स्मशान जोगी संघटनेचे अध्यक्ष गोविंद राजाराम गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम प्रकाश बांगर यांनी केले.
Source link
हजारोंचे अश्रू पुसणाऱ्या, आनंदाच्या क्षणी दुर्लक्षित स्मशान जोग्यांचा सत्कार:अर्थ अभ्यासक डॉ. डी. एस. काटे यांची नाविन्यपूर्ण संकल्पना