पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्यंत अमानुष आणि राक्षसी अत्याचार-हत्या प्रकरणाचा विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नर
.
नसरापूर घटनेनंतर पीडित कुटुंबाची भेट घेणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या ऐतिहासिक निकालानंतर राज्य सरकारच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले, मात्र सोबतच इतर प्रलंबित खटल्यांकडे लक्ष वेधले. जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांचे कौतुक केले पाहिजे की त्यांनी या प्रकरणात विशेष तत्परता दाखवली, ज्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत या नराधमाला फाशीची शिक्षा झाली. यामुळे पीडित कुटुंबाला आणि महाराष्ट्रातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.”
यासोबतच “असाच कडक आणि वेगवान न्याय आता संतोष देशमुख हत्याप्रकरण, महादेव मुंडे आणि मालेगाव येथील ३ वर्षीय मुलीच्या अत्याचार प्रकरणात सुद्धा लावायला हवा. हे खटलेही तातडीने निकाली काढून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, हीच आमची मागणी आहे,” असे मनोज जरांगे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात मी उभा राहतो
या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी आणि आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही स्वतः, सरकार आणि बच्चू कडू देखील लक्ष ठेवून आहोत. रोहित पवार देखील शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि तेही यात सक्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः नेहमीच आघाडीवर असतो आणि यापुढेही जात राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा…
भीमराव कांबळे आता फासावर चढा!:न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर चिमुरडी अत्याचारप्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय घडलं

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या 65 वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाला आज (29 जून) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी राज्याला हादरवून सोडणाऱ्या प्रकरणात हा ऐतिहासिक निकाल दिला. हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने चाललेला खटला ठरला असून, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत आणि खटल्याच्या सुनावणीच्या १६ दिवसांत हा निकाल लागला आहे. येथे वाचा सविस्तर बातमी