![]()
“संजय राऊत यांचे मानसिक स्वास्थ्य बऱ्याच दिवसांपासून बिघडले असून, त्यांना मानसिक शांततेसाठी एखाद्या शिबिरात किंवा विपश्यनेला पाठवण्याची खरी गरज आहे,” असा जोरदार हल्लाबोल भाजपचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संसदेत मांडले जाणारे नवे परीक्षा सुधारणा विधेयक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील विरोधकांचे आरोप आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. संजय राऊतांना मानसिक शांती शिबिरात पाठवा संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत त्यांच्यावर केलेल्या टीकेचा डॉ. गोपछडे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, “संजय राऊत यांनी स्वतःचे आत्मचिंतन करावे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळेच चांगले शिवसैनिक पक्षापासून दुरावले असून, महाराष्ट्रातील शिवसेना लयास नेण्याचे आणि शून्य करण्याचे काम राऊतांनीच केले आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या मानसिक शांती शिबिरात पाठवण्याची गरज आहे.” अमित शहांचे समर्थन करताना ते म्हणाले की, “देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कार्यकाळ अमित शहांचा राहिला आहे. त्यांच्याच काळात कलम ३७० हटवण्यात आले, अतिरेकी कारवाया रोखल्या गेल्या आणि नक्षलवाद तडीपार झाला.” उद्धव ठाकरे सरकारची आठवण राऊतांना प्रत्युत्तर देताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकरणांची आठवण करून दिली. “ज्या सरकारच्या काळात मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याचे प्रकरण घडले, सचिन वाजेसारख्यांना पोलीस सेवेत घेतले गेले, त्या गृहखाते सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा राजीनामा का दिला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवे परीक्षा विधेयक हा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय केंद्र सरकारने लोकसभेत पारित करून आता राज्यसभेत आणलेल्या स्पर्धा परीक्षा सुधारणा विधेयकाचे त्यांनी स्वागत केले. “ब्रिटिशकाळापासून शिक्षण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर करणारे हे क्रांतिकारी पाऊल आहे. ‘नीट’सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणणे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देणे हा या मागचा उद्देश आहे.” “या नव्या कायद्यात पेपरफुटी आणि गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. देशातील तरुण डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी हे एक अत्यंत चांगले पाऊल आहे,” असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. राहुल गांधींना संसदेतील नियम आणि कायदे माहीत नाहीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘संसदेत बोलू दिले जात नसून आता रस्त्यावर लढाई लढणार’ असल्याच्या वक्तव्यावरही डॉ. गोपछडे यांनी खोचक टीका केली. “राहुल गांधींना संसदेतील नियम, कायदे आणि प्रोटोकॉल माहीत नाहीत. स्वतःच्या माईकचे बटण बंद ठेवून माईक बंद केला आहे, असे म्हणणारे हे ‘बाळराजे’ आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सांगत असूनही त्यांना माईक चालू असल्याचे कळत नाही.” “संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा करणे त्यांना जमत नाही, म्हणूनच ते रस्त्यावर लढाई करण्याची भाषा करतात. खोटा नॅरेटिव्ह पसरवणे आणि पोरकटपणाचे खेळ करून मीडियाचे लक्ष वेधून घेणे, एवढाच त्यांचा उद्योग राहिला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. विरोधक चर्चेतून पळ काढतात संसदेचे कामकाज रोखण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “संसदेत कायदे आणि बिलांवर चर्चा सुरू झाली की विरोधक पळ काढतात आणि बाहेर येऊन केवळ मीडियासमोर मोर्चे व फलक दाखवण्याचे काम करतात. सकारात्मक चर्चेत भाग न घेणाऱ्या अशा विरोधकांमुळेच ‘काँग्रेस आणि इंडी’ आघाडी आता प्रत्येक राज्यात शून्य होत चालली आहे,” अशी टीका डॉ. अजित गोपछडे यांनी केली. हेही वाचा.. ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ:भारताला आतून पोकळ करण्याचे षड्यंत्र उधळण्यासाठी तरुणाईने एकजुटीने लढावे— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “आज आपला भारत देश अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संरक्षण क्षेत्रात जगाला थक्क करणारी प्रगती करत आहे. समोरच्या युद्धात भारताला हरवणे शक्य नसल्याचे शत्रूंना कळून चुकले आहे. त्यामुळे भारताची खरी ताकद असलेल्या युवा पिढीला अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढून देशाला आतून पोकळ करण्याचे मोठे षड्यंत्र आणि एक ‘छुपे युद्ध’ सुरू आहे. हे षड्यंत्र उधळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ड्रग्जच्या विरोधात सामूहिक लढा उभारणे गरजेचे आहे,” असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
संजय राऊतांना मानसिक शांती शिबिरात पाठवण्याची गरज:भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे म्हणाले- विरोधक चर्चेतून पळ काढतात