Headlines

अमरावतीत रोज 64 जणांना श्वानदंश:मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र अद्यापही नाही




अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी ६४ नागरिकांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारणीला अद्याप गती मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण २३,३९९ नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयांमधील असून, खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या यात समाविष्ट नाही. त्यामुळे श्वानदंशाची खरी आकडेवारी याहून अधिक भयावह असण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, अमरावती महानगरपालिका प्रशासनाने भटक्या श्वानांची मोजदाद आणि त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निवारा केंद्रासाठी जागेची निश्चिती झाली असून, लवकरच बांधकाम पूर्ण होऊन केंद्र कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित वेग आलेला नाही, त्यामुळे नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *