Headlines

Banda Records 47.60°C Highest Temp in India; Yellow Alert for 8 Maharashtra Districts


  • Marathi News
  • National
  • Banda Records 47.60°C Highest Temp In India; Yellow Alert For 8 Maharashtra Districts

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली-पुणे3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात मे महिना म्हणजे भीषण उष्णतेचा प्रकोप मानला जातो. मात्र यंदा वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र भाजून निघत आहे. छत्रपती संभाजीनगरात रविवारी या हंगामासह सात वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 43.4 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. नाशिकमध्ये शनिवारीच या हंगामातील सर्वाधिक 41.5 तापमान नोंदवण्यात आले. सोलापूरने सलग दोन दिवस (26, 27 एप्रिल) 43.9 अंशाचा पारा गाठला आहे. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान आहे. अहिल्यानगरात 41.8 अंश सेल्सियसची नोंद झाली.

दरम्यान, मंगळवारी (28 एप्रिल) अमरावती, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारपासून उष्णतेची लाट ओसरणार असून, बऱ्याचशा भागात अवकाळी पाऊस कोसळणार, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

या वर्षी आतापर्यंत एप्रिल महिन्यात देशातील विविध ठिकाणी सुमारे 45 वेळा तापमान 45 अंशांवर पोहोचले. 2022 नंतरची ही सर्वाधिक नोंद आहे, तेव्हा असे 56 वेळा घडले होते. याचा अर्थ, गेल्या चार वर्षांतील हा सर्वात उष्ण एप्रिल महिना ठरला आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आकाश निरभ्र आहे. थेट सूर्यप्रकाशामुळे तापमान वाढत आहे. सोमवारी, उत्तर प्रदेशातील बांदा येथे पारा 47.6 अंशावर पोहोचला. हे देशाच्या एप्रिल महिन्याच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान आहे. आयएमडीनुसार, जेव्हा कमाल तापमान 45 अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक होते, तेव्हा उष्णतेची लाट असल्याचे मानले जाते.

बुधवारनंतर अवकाळीचा अंदाज

विदर्भ : मंगळवारी मराठवाडा तसेच विदर्भातील तुरळक भागात उष्णतेची लाट राहणार आहे. बुधवारपासून 3 ते 4 दिवस विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा : मंगळवारी हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात काहीशी घट होईल. या जिल्ह्यातील काही भागात गुरुवार, शुक्रवारी पाऊसही होऊ शकतो. मध्य महाराष्ट्र : मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान पुढील 2-3 दिवसांत 2° ते 3 अंश सेल्सियसने घट होण्याचा अंदाज आहे. 27 एप्रिलला सोलापूरमध्ये तापमान 43.9° अंश होते, ते 30 एप्रिलपर्यंत 41 ते 42 अंशापर्यंत खाली येऊ शकते. 29 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्याने तीव्र उष्णता आणि हवामान बदलाची कारणे समजून घ्या…

1. बाष्पयुक्त वारे: अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्र एप्रिलमध्ये तापला आहे. उत्तर आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाल्याने वेळेआधीच उष्णता वाढली आहे. 2. तापमानात वाढ: गेल्या 50 वर्षांतील आकडेवारी सांगते की, कमाल तापमानाचा आलेख सातत्याने वाढत आहे. 3. उष्णतेच्या लाटेचा धोका: पुढील 15-20 वर्षांत उष्णतेच्या लाटा आधीच्या तुलनेत अडीचपट वाढू शकतात. 4. बदलते विक्रम: 2010 सारखी भयकंर गरमी आता दर तीन वर्षांनी होऊ शकते. 5. दरवर्षीचे संकट: ही स्थिती बदलली नाही तर या शतकाच्या अखेरीस तीव्र उष्णतेच्या लाटा दरवर्षी एक सामान्य नैसर्गिक घटना बनतील. उष्णतेच्या लाटांचा कालावधी वाढेल. क्षेत्रही वाढेल. तीव्रताही आधीपेक्षा घातक असेल.

तज्ज्ञांचा सल्ला : मुले, वृद्धांना जपावे

तापमान 40 अंश सेल्सियसवर जाताच 60 मिलीलिटर क्षारयुक्त पाणी दर तासाला मानवी शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे उष्माघाताची शक्यता वाढते. म्हणून विशेषत: मुले आणि वृद्धांना जपावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *