![]()
हिंगोली तालु्क्यातील कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 28 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपूर्वी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वसमत तालुक्यातील गिरगाव ये्थील काही वऱ्हाडी मंडळी विवाह सोहळ्यात आली होती. यावेळी विवाह सोहळा सुरळीत पार पडत असतांना नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून काही वऱ्हाडी मंडळीमध्ये वादाला तोंड फुटले होते. मात्र इतर मंडळींनी समजावून सांगितल्यानंतर वाद मिटला होता. त्यानंतर विवाह सोहळा पार पडला. मात्र बुट लपविण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी पुन्हा वाद उकरून काढत गणेश डाळ यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पोटात खंजीरने वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे ते खाली पडले. सदर प्रकार सोडविण्यासाठी श्रावण गाढवे हे मध्ये पडले असता चौघांनी त्यांनारहा मारहाण करून त्यांच्याही पोटात खंजरने वार करून जिवे मारण्याची प्रयत्न केला. यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये गजानन, श्रावण यांच्यासह मारहाण करणारे विष्णू कुंभारकर, प्रभू बारसे हे जखमी झाले. गावकऱ्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी श्रावण गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी विष्णू कुंभारकर, प्रभू बारसे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुगे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. उपनिरीक्षक राहुल घुगे पुढील तपास करीत आहेत.
Source link
नवरदेवाचा बूट लपवला म्हणून पोटात खुपसला खंजीर!:2 जण गंभीर जखमी, चौघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल