Headlines

अडीच लाखाच्यावर विद्यार्थ्यांना मिळताहेत अध्यात्माविषयी धडे:78 गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तरुण पिढीला घडवण्याचा उपक्रम‎




आजची तरुण पिढी ही वाम मार्गावर न जाता ती संस्कारक्षम व्हावी या दृष्टीने नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ पासुन सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून यंदा २० एप्रिल नंतर वेगवेगळ्या तारखांना ७८ गावांमध्ये सुसंस्कार शिबिरे सुरू झाली आहेत या शिबिरामध्ये अडीच लाख गुरुदेव प्रेमी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या शिबिरार्थीच्या बालमनावर सुसंस्कार अध्यात्माचे धडे तज्ञ शिक्षकांद्वारे गिरवण्यात येत आहे. ही सर्व शिबिरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कृपा पात्र आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. नांदुरा खुर्द येथील श्री गुरुदेव सेवाश्रमातील निवासी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे यंदाचे ४६ वर्षे आहे यंदा २२ एप्रिल ते २ मे या कालावधीत मुलींसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शंभर मुलींनी सहभाग घेतला होता तर दोन मे पासून मुलांसाठी सुरू झालेल्या या शिबिरात बारा ते अठरा वर्षे वयोगटातील वर्धा अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, उस्मानाबाद येथील सुमारे २८० शिबिरार्थी बालक सहभागी सहभागी झाले आहेत. त्यांना अध्यात्म सुसंस्कार व विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येत १९८१ ते २०२५ या ४५ वर्षाच्या कालावधीत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेली बालके हे आदर्श जीवन जगत आहे आणि मोठ्या पदावर नोकरीवर आहे आज जरी ते मोठ्या हुद्द्यावर गेले असले तरी त्यांची नाळ ही आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्याशी आजही जुळलेली दिसून येत आहे आजची बालके ही अध्यात्मापासून व संस्काराला विसरून व्यसनी होऊन वाईट मार्गावर जात आहे हे पाहून आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी त्यांच्या मनावर संस्काराचे धडे घेऊन त्यांना आदर्श नागरिक बनवण्याचा एक भाग म्हणून सुसंस्कार शिबिर राबवणे सुरू केले आहे काही वर्ष पालकांना शिबिराचे महत्त्व पटली नव्हते त्यामुळे या शिबिरात सहभागी होणाऱ्या शिबिरार्थी बालकांची संख्या कमी होती पण आता पालकांना याचे महत्त्व पटल्यामुळे यामध्ये दरवर्षी सहभागी होणाऱ्या शिबिरार्थी बालकांची संख्या वाढत आहे या शिबिरांसाठी लागणारा खर्च हा लोकसहभागातून करण्यात येत आहे आज समाजात शेकडो दानशूर आहे हे दानशूर स्वतःहून दान देत आहे त्यांच्यात भरवशावर शिबिरासाठी लागणारा भोजनापासून ते अन्य खर्च भागवल्या जात आहे यावर्षी शिबिरात सहभागी झालेल्या बालकांना आठ ते दहा जणांची जम्मू प्रशिक्षण देत आहेत. या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत संस्कार शिबिरे महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर भद्रावती नागपूर अमरावती अकोला वाशीम जळगाव खान्देश बुलडाणा यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ही शिबिरे घेण्यात येत आहेत. या शिबिरातून चांगली पिढी घडत असते. अनेक प्रशिक्षित मुले बनले आदर्श शिक्षक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचे कार्य हे बालकांवर सुसंस्काराचे धडे देण्यावरच थांबले नाही तर त्यांनी सुसंस्कार शिबिरातून बाहेर पडलेल्या पैकी ज्यांना प्रशिक्षक शिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा आहे अशांना गुरुजींनी प्रथम सहाय्यक शिक्षक व नंतर शिक्षक बनवले आहे. दरवर्षी शिबिरातून शिबिरार्थींना मार्गदर्शन करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *