Headlines

परिचारिका दिनी परिचर्या क्षेत्राचे महत्त्व, भूमिकेबाबत जनजागृती:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यक्रम‎




शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिचर्या क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. परिचर्या क्षेत्राचे महत्त्व आणि रुग्णांच्या सेवेतील परिचारिकांची भूमिका यावर जनजागृती केली. दिनाचे औचित्य साधून सकाळी महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या परिसरातून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून परिचारिकांनी परिचर्या क्षेत्राचे महत्त्व आणि रुग्णांच्या सेवेतील परिचारिकांची भूमिका यावर जनजागृती केली. रॅलीची सुरुवात आणि कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. संजय सोनवणे, अधिसेविका ग्रेसी ऑगस्टीन, प्राचार्य सरिता राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. सूत्रसंचालन संगीता जोध आणि प्रास्ताविक श्रीमती जया खांबलकर यांनी केले. अधिष्ठाता डॉ. संजय सोनवणे यांनी आरोग्य यंत्रणेत परिचारिका या कणा असल्याचे नमूद करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महेश महाकालीवर, अधिसेविका ग्रेसी ऑगस्टीन, सहाय्यक अधिसेविका प्रियांका जाधव तसेच परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य सरिता राठोड आदींचा समावेश होता. प्रतिमा पूजन; परिचर्या प्रतिज्ञा परिचर्या क्षेत्राच्या जननी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व परिचारिकांनी रुग्णसेवेचे व्रत अधिक निष्ठेने जोपासण्याची परिचर्या प्रतिज्ञा घेतली. रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सेवानिवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ परिसेविकांचा याप्रसंगी परिचर्या कार्यभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शारदा घाडगे, संगीता हिवाळे यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या इतर परिचारिकांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *