Headlines

विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू होण्याची शक्यता:उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तज्ज्ञ समितीची अमरावती विद्यापीठात बैठक; प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी मांडली भूमिका




उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विद्यापीठांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या दोन सदस्यांनी अमरावती विद्यापीठात प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधींची मते ऐकून घेतली. संत गाडगे अमरावती विद्यापीठातील अधिसभा सभागृहात ही बैठक झाली. आगामी निवडणुका निःपक्षपातीपणे कशा घ्याव्यात, यावर चर्चा झाली. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्याची तरतूद आहे. समिती सदस्य डॉ. अविनाश मोहरील आणि प्रा. डॉ. प्रशांत साठे यांनी प्रचार, मतदान व प्रतिनिधी निवडीबाबत मते जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी कमी वेळेत निवडणुका घेण्याची, राजकीय हस्तक्षेप टाळण्याची आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना सुविधा देण्याची मागणी केली. स्वतंत्र प्राधिकरण, पारदर्शक मतदार यादी, सीसीटीव्ही, महिला सहभाग व खर्चावर मर्यादा या सूचनाही मांडल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *